विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : भारतासमवेत शस्त्रसंधी करण्याचे एकीकडे नाटक करायचे आणि दुसऱ्या बाजूला जम्मू – काश्मीरमध्ये अशांतता कशी पसरेल याची योजना आखायची अशी दुहेरी चाल पाकिस्तान खेळत असल्याचे त्यांच्या कारवायांवरून स्पष्ट होत आहे. Pakistan sending arms for terrorist
कारण फेब्रुवारीत शस्त्रसंधी होऊनही पाकिस्तानने वेगवेगळ्या दहशतवादी गटांना शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि अगदी रोख रकमेसह रसद पुरविणे कायम ठेवल्याचे शुक्रवारी पाडण्यात आलेल्या ड्रोनमधील स्फोटक संचावरून स्पष्ट झाले आहे. हे आयईडी पाच किलो वजनाचे होते. ते तातडीने वापरता येण्याइतपत सज्ज करण्यात आले होते.
त्याद्वारे जम्मूमधील गर्दीच्या बाजारपेठेत हल्ला करण्याचा जैश-ए-महंमद या दहशतवादी गटाचा डाव होता.
२३ जुलै रोजी अखनूरमध्ये आणि गतवर्षी कथुआमध्ये पाडण्यात आलेल्या ड्रोनच्या नियंत्रक संचाच्या क्रमांकात एका आकड्याचा फरक होता. गेल्या आठवड्यात पाडण्यात आलेल्या मानवरहित हवाई वाहनांचे काही भाग चीन आणि तैवानमध्ये जुळविण्यात आले होते. सुरक्षा दलांनी आतापर्यंत असे ४१ पैकी ३३ प्रयत्न फोल ठरविले आहेत.
याप्रकरणी पोलिस आणि इतर सुरक्षा संस्थांनी दहशतवाद्यांच्या असंख्य साथीदारांना जेरबंद केले आहे. त्यामुळे लष्करे तैयबा आणि जैश-ए-महंमद अशा गटांना शस्त्रास्त्रे व दारुगोळ्याचा तुटवडा भासतो आहे. अशावेळी पाक सरकारचा पाठिंबा असलेल्या काही संस्था सक्रिय झाल्या आहेत.
Pakistan sending arms for terrorist
महत्त्वाच्या बातम्या
- मल्ल्याला भारताच्या ताब्यात देण्याबाबत ब्रिटन सकारात्मक
- Mann ki Baat : राष्ट्रगीतावर अनोखे अभियान ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापर्यंत, जाणून मोदींच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे
- Pegasus Issue : पेगासस वादावरून माकप खासदाराची सुप्रीम कोर्टात धाव, SIT चौकशीसाठी याचिका दाखल
- Raj Kundra Pornography Case : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या संयुक्त खात्यात परदेशातून पैसे; आता ईडी करणार मनी लॉन्ड्रिंगची चौकशी
- गल्लत गोल्ड मेडलची : प्रिया मलिकने वर्ल्ड कॅडेट रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण, लोकांना वाटले ऑलिम्पिक गोल्ड