• Download App
    पाकिस्तानने अफगाणिस्तानात घुसविले तब्बल २० हजार दहशतवादी, सरकारनेच केला आरोप|Pakistan send 20 K terrorist in Afghanistan

    पाकिस्तानने अफगाणिस्तानात घुसविले तब्बल २० हजार दहशतवादी, सरकारनेच केला आरोप

    विशेष प्रतिनिधी

    काबूल – तालिबान आणि त्याचे समर्थक पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयने पाकिस्तानच्या मदरशातून वीस हजाराहून अधिक मुलांना अफगाणिस्तानात पाठवले आहे. तालिबानचे अल कायदा आणि अन्य कट्टरपंथीय संघटनांशी देखील संबंध आहेत.Pakistan send 20 K terrorist in Afghanistan

    अफगाणिस्तानचे सैनिक किमान १३ दहशतवादी संघटनांचा सामना करत आहेत असे खडे बोल अफगाणिस्तानचे उपाध्यक्ष अमीरुल्लाह सालेह यांचे प्रवक्ते रिझवान मुराद यांनी पाकिस्तानला सुनावले आहेत.
    ते म्हणाले, कुडुंज, तखार, कंदहारच्या स्पिन बोल्डाकमध्ये तालिबानकडून नागरिकांवर क्रुर अत्याचार केले जात आहेत.



    लहान मुलांची हत्या केली जात आहे. पत्रकारांची देखील हत्या होत असून शाळा पेटवून दिल्या जात आहे. सरकारी इमारती जाळल्या जात आहेत. सरकारने देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहा महिन्याची सुरक्षा योजना तयार केली असून लवकरच दोन तीन महिन्यांत स्थितीत सुधारणा होईल.

    दरम्यान, इराणच्या सीमेजवळ जरांज येथे तालिबानने ताबा मिळवला आहे. याच भागातून इराणमार्गाने अफगाणिस्तानशी व्यापार होतो. आंतरदेशीय व्यापारासाठी महत्त्वाचा जरांज-डेलाराम हा २१७ किलोमीटरचा महामार्ग भारताने तयार केलेला आहे. या मार्गावर तालिबानचा वरचष्मा आहे. त्यामुळे अफगाणिस्तान सरकारला मोठा झटका बसला आहे.

    Pakistan send 20 K terrorist in Afghanistan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India-UK : भारत-ब्रिटनमध्ये FAT वर स्वाक्षरीची शक्यता; ब्रिटनच्या आलिशान गाड्या आणि ब्रँडेड कपडे स्वस्त होणार

    Robert Vadra : गुरुग्राम लँड डीलमध्ये रॉबर्ट वाड्रा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल; पहिल्यांदाच ईडीने औपचारिक आरोपी बनवले

    Praggnanandhaa : प्रज्ञानंदाने वर्ल्ड नंबर-1 कार्लसनला 39 चालींमध्ये हरवले; लास वेगास स्पर्धेत अव्वल