• Download App
    Operation Sindoor impact : पाकिस्तानची दोन f16 विमाने भारतीय मिसाईल्सने पाडली; पाकिस्तानचा जम्मू, जैसलमेरवर मोठा मिसाइल हल्ला, भारताचे जोरदार प्रत्युत्तर!!

    Operation Sindoor impact : पाकिस्तानची दोन f16 विमाने भारतीय मिसाईल्सने पाडली; पाकिस्तानचा जम्मू, जैसलमेरवर मोठा मिसाइल हल्ला, भारताचे जोरदार प्रत्युत्तर!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी मोहिमेमुळे चवताळलेल्या पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि मिसाईल हल्ले चढविले. भारतातल्या लष्करी आणि नागरी ठिकाणांना टार्गेट केले. जम्मू-काश्मीर पासून गुजरात मधल्या कच्छच्या रणापर्यंत वेगवेगळ्या शहरांवर भारतीय हवाई हद्दीचा भंग करून हल्ला करायचा प्रयत्न केला. परंतु भारताच्या हवाई हल्ला हवाई हल्ला संरक्षण प्रणालीने अर्थात एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानचे सगळे हल्ले परतवून लावले.

    पाकिस्तानची दोन f16 विमाने पाकिस्तान मधल्या सरगोधा विमानतळावरून उडाली पण ती भारताच्या हवाई हद्दीत शिरण्यापूर्वीच भारताच्या आकाश या सरफेस टू एअर मिसाईलने उडवून लावली. भारताने ही दोन f16 विमाने पाडल्याचे पाकिस्तानने कबूल केले.

    त्याचवेळी पाकिस्तानने जम्मू, पठाणकोट मध्ये आणि राजस्थानातल्या जैसलमेरमध्ये ड्रोन आणि मिसाइल हल्ला केला. जम्मू परिसरातील सतवारी सांबा रेसपुरा आणि आम्ही या परिसरात मिसाईल्स डागली. जैसलमेर वर सहा मिसाईल्स डागली. सर्व ठिकाणी स्फोटांचे मोठे आवाज आले. परंतु भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमने हा मिसाईल हल्ला परतवून लावल्याचे भारतीय सैन्य दलाच्या सूत्रांनी सांगितले.

    या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू कश्मीरपासून पंजाब, राजस्थान आणि गुजरातच्या सर्व सीमावर्ती भागामध्ये वॉर अलर्ट जरी करून ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. सर्व राज्यांमध्ये एअर डिफेन्स सिस्टीम हाय अलर्ट मोडवर असून पाकिस्तानकडून होणारा कुठलाही हल्ला परतवण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहे, असे भारतीय सैन्य दलाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

    Pakistan launched 8 missiles at Satwari, Samba, RS Pura and Arnia sector, All intercepted by Indian Air Defence units

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rohit Sharma : रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त; इंग्लंड दौऱ्यात कर्णधारपदावरून काढून टाकल्याची चर्चा

    Uttarkashi Uttarakhand : उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये हेलिकॉप्टर कोसळले ; पाच ठार, दोन जखमी

    Anti-Sikh riots : शीखविरोधी दंगली; निर्दोष सुटलेल्या 6 आरोपींना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस