वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : पाकिस्तान हा अण्वस्त्र सज्ज पण दिशा भरकटलेला एक घातक देश आहे, अशा शब्दांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी साधले आहे. पण हे शरसंधान साधण्यापूर्वी आपल्याच अमेरिकेने दिशा भरकटलेल्या घातक पाकिस्तान देशाला f16 विमानांची मदत दिली आहे, हे मात्र बायडेन सोयीस्कर रित्या विसरले आहेत. Pakistan is a dangerous country that has gone astray
अमेरिकन काँग्रेसच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारांसाठी ठिकठिकाणी प्रचार करताना जो बायडेन यांनी आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर प्रामुख्याने भर देत भाष्य केले. युक्रेन वर हल्ला करणाऱ्या रशियाला दम दिला. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे कणखर व्यक्तिमत्व असलेले, परंतु विविध प्रश्नांच्या जंजाळात सापडलेले नेते आहेत, अशी टिप्पणी केली. त्याचवेळी त्यांनी पाकिस्तान देशाबाबतही परखड मत व्यक्त केले. पाकिस्तान हा एक दिशा भरकटलेला अण्वस्त्र सज्ज देश आहे, असे ते म्हणाले. पण गेल्याच महिन्यात अमेरिकेने आपल्याच प्रशासनाने पाकिस्तानला एफ 16 विमानांची एक फ्लिट मंजूर केली आहे. हे मात्र ते जो बायडेन सोयीस्कर रित्या विसरले.
जो बायडेन म्हणाले :
जग फार वेगाने बदलते आहे. ते कोण्या एका व्यक्तीमुळे किंवा एखाद्या देशामुळे नाही. पण काही शक्ती मात्र त्याला आपल्या पद्धतीचे वळण देऊ इच्छितात. रशियाला युक्रेन वर अणुहल्ला करायचा आहे. पण त्यामागे रशियाचा हेतू नाटो करार तोडून करारातील देशांना फोडायचा आहे. रशियाच्या या प्रयत्नांमुळे जगात परत एकदा घातक शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू होऊ शकते किंबहुना मोठी धुमश्चक्री होऊ शकते. अमेरिका हे कोणत्याही स्थितीत घडू देणार नाही.
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे कणखर व्यक्तिमत्व असलेले नेते आहेत. आपल्याला काय हवे हे त्यांना पक्के समजते, पण ते त्यांच्या देशातल्या अनेक प्रश्नांच्या जंजाळात अडकले आहेत. मी अमेरिकेचा उपाध्यक्ष असताना अध्यक्ष बराक ओबामा यांनी मला त शी जिनपिंग यांच्याशी सतत संपर्क ठेवण्याची असाइनमेंट दिली होती. मी त्यांच्याबरोबर सर्वाधिक वेळ घालवला आहे. तासाच्याच हिशोबात मोजायचे झाले, तर 78 तास मी त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्यातले 68 तास तर मी आणि ते असे दोघेच चर्चा करत होतो. त्यामुळे मला त्यांच्याविषयी व्यवस्थित माहिती आहे आणि म्हणूनच ते कणखर व्यक्तिमत्व आहे पण ते विविध प्रश्नांच्या जंजाळात अडकले आहे असे मी ठामपणे म्हणू शकतो.
Pakistan is a dangerous country that has gone astray
महत्वाच्या बातम्या
- तुर्कीतील कोळसा खाणीत मोठा स्फोट : 22 जण ठार, अनेक जण अडकल्याची भीती, बचाव कार्य सुरू
- गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा का जाहीर झाल्या नाहीत, निवडणूक आयोगाने दिले हे उत्तर..
- दोनदा भाजपबरोबर आयाराम – गयाराम करणारे नितीश कुमार म्हणाले, “भाजप बरोबर कधीच जाणार नाही”!!
- सरकारी नोकरीची संधी : SSC अंतर्गत ९९० पदांसाठीची भरती; करा ऑनलाईन अर्ज