• Download App
    पाकिस्तानने PoKमध्ये लावला कर्फ्यू; वाढती महागाई आणि वीज कपातीच्या विरोधात लोकांची निदर्शने Pakistan imposes curfew in PoK; People protest against rising inflation and power cuts

    पाकिस्तानने PoKमध्ये लावला कर्फ्यू; वाढती महागाई आणि वीज कपातीच्या विरोधात लोकांची निदर्शने

    वृत्तसंस्था

    इस्लामाबाद : पीओकेमध्ये वाढती महागाई आणि वीज कपातीविरोधात शुक्रवारी (10 मे) पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमक झाली. निदर्शने थांबवण्यासाठी पाकिस्तानने पीओकेच्या मीरपूर जिल्ह्यात संचारबंदी लागू केली. Pakistan imposes curfew in PoK; People protest against rising inflation and power cuts

    लोक कर्फ्यूला विरोध करत आहेत. पीओकेमधील मीरपूरमध्ये पोलिसांनी शालेय विद्यार्थ्यांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, अनेक विद्यार्थी जखमी झाले. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानातील मुझफ्फराबादमधील लोक 11 मे रोजी विधानसभेबाहेर मोठे आंदोलन करणार आहेत.

    पीओकेचा सर्वात मोठा पक्ष, युनायटेड काश्मीर पीपल्स नॅशनल पार्टी (यूकेपीएनपी) ने आंदोलनादरम्यान केलेल्या अटकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पोलिसांनी आणि लष्कराने मिळून अटक केलेल्या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचे पक्षाने म्हटले आहे. UKPNP नेते शौकत अली काश्मिरी आणि नासिर अझीझ खान यांनी अटक केलेल्या आंदोलकांची तत्काळ सुटका करण्याची मागणी केली. UKPNP ने UN मानवाधिकार संस्थेला विलंब न करता हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे.

    पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने म्हटले- पीओकेमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन

    पीओकेमधील खराब परिस्थितीबद्दल, पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने (एचआरसीपी) स्वतः कबूल केले आहे की तेथे सातत्याने मानवी हक्कांचे उल्लंघन केले जात आहे. गेल्या महिन्यातही लोकांनी वाढत्या महागाईविरोधात निदर्शने केली होती.

    अनेक ठिकाणी लोकांनी रस्त्यावर उतरून पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तिथे एक किलो पीठ 800 पाकिस्तानी रुपयांना मिळते. तर पूर्वी ते 230 रुपये होते. तिथल्या एका रोटीचा भाव 25 रुपयांवर पोहोचला आहे.

    पाकिस्तानची गरिबी…

    देशाचा परकीय चलनाचा साठा सध्या $8 अब्ज इतका आहे, जो सुमारे दीड महिन्याच्या वस्तूंच्या आयातीइतका आहे. देशाकडे किमान 3 महिने माल आयात करण्याइतका पैसा असला पाहिजे.

    2024 मध्ये पाकिस्तानचा जीडीपी केवळ 2.1% दराने वाढण्याची शक्यता आहे. सध्या एका डॉलरची किंमत 276 पाकिस्तानी रुपयांएवढी आहे.

    Pakistan imposes curfew in PoK; People protest against rising inflation and power cuts

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    Judge Cash case : जज कॅश केस, सरन्यायाधीशांनी PM-राष्ट्रपतींना अहवाल सोपवला; तीन न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी