दहशतवादाला आश्रय देणारा शेजारी देश पाकिस्तान भारत आणि काश्मिरींच्या विरोधात नवनवीन डावपेच अवलंबत आहे. आता पुन्हा एकदा पाकिस्तानने भारताविरोधात नवी खेळी केली आहे. गो फर्स्टच्या श्रीनगर-शारजाह फ्लाइटसाठी पाकिस्तानने आपली हवाई हद्द वापरण्यास नकार दिला आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी याला दुर्दैवी म्हटले आहे. pakistan has refused its airspace use to go first srinagar sharjah flight
वृत्तसंस्था
श्रीनगर : दहशतवादाला आश्रय देणारा शेजारी देश पाकिस्तान भारत आणि काश्मिरींच्या विरोधात नवनवीन डावपेच अवलंबत आहे. आता पुन्हा एकदा पाकिस्तानने भारताविरोधात नवी खेळी केली आहे. गो फर्स्टच्या श्रीनगर-शारजाह फ्लाइटसाठी पाकिस्तानने आपली हवाई हद्द वापरण्यास नकार दिला आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी याला दुर्दैवी म्हटले आहे.
सूत्रांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, भारताने पाकिस्तानच्या या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर संबंधित मंत्रालयांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. सध्या MoCA, MEA आणि MHA या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
ओमर अब्दुल्ला म्हणाले – हे दुर्दैवी!
पाकिस्तानच्या या निर्णयावर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले, “खूप दुर्दैवी. 2009-10 मध्ये श्रीनगरहून दुबईला जाणार्या एअर इंडिया एक्सप्रेसला पाकिस्तानने असेच केले होते. मला अपेक्षा होती की GoFirst Air विमानाला हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी देणे हे संबंध सुधारण्याचे लक्षण आहे, परंतु दुर्दैवाने तसे झाले नाही.
अमित शहा यांनी दाखवला होता ग्रीन सिग्नल
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीर दौऱ्यावर असताना श्रीनगर ते शारजाह विमानाला हिरवा झेंडा दाखवला होता. ही फ्लाइट गो फर्स्टने सुरू केली होती. GoFirst श्रीनगर आणि शारजाहदरम्यान आठवड्यातून चार फ्लाइट चालवते.
pakistan has refused its airspace use to go first srinagar sharjah flight
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान