विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताने “ऑपरेशन सिंदूर” मधून काय मिळवले??, असा “अतिउच्चशिक्षित बौद्धिक” प्रश्न करण थापरने विचारला, त्यावर पाकिस्तानात घुसून पंजाब मध्ये त्याच्या छातीवर प्रहार केले असे उत्तर देऊन काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी करण थापरला गप्प केले. 1962 च्या युद्धात चीनकडून मार खाणारे जनरल प्राणनाथ थापर यांचा करण थापर हा मुलगा आहे.
ऑपरेशन सिंदूर संदर्भात “द वायर” यूट्यूब चॅनल वर करण थापरने शशी थरूर यांची मुलाखत घेतली. त्यात त्याने “ऑपरेशन सिंदूर” मधून भारताने नेमके काय मिळवले??, असा खोचक सवाल केला. शशी थरूर हे काँग्रेसचे खासदार आहेत. त्यामुळे ते वेगळे उत्तर देतील, अशी करण थापरची अपेक्षा होती, पण शशी थरूर यांनी खणखणीत प्रत्युत्तर देऊन करण थापरला गप्प केले. शशी थरूर यांचे हे खणखणीत उत्तर सगळीकडे चांगलेच व्हायरल झाले. लिबरल जमातीच्या तोंडावर चपराक बसली.
शशी थरूर म्हणाले :
- पहिली गोष्ट, तर भारताने हे मोठे युद्ध नाही, ही भूमिका आधीच जाहीर केली होती. दहशतवादी आणि त्यांचे आका यांना आम्ही सोडणार नाही, ते जातील तिथे त्यांना ठोकून काढू, असे भारताने आधीच जाहीर केले होते. त्या धोरणानुसार भारताने अचूक हल्ले केले.
- भारताने पाकिस्तान मधल्या बहावलपूर आणि मुरिदके इथल्या दहशतवादी केंद्रांवर हल्ले केले, ती केंद्रे उद्ध्वस्त केली. पाकिस्तान मधल्या “पंजाबी हार्ट लँड” मध्ये हे हल्ले केले. तिथे बाकी कुठलेही “डॅमेज” केले नाही.
- उरी, बालाकोट मधल्या हल्ल्यानंतर भारताने सीमेनजीक सर्जिकल आणि एअर स्ट्राईक केले. बालाकोट नंतर तर भारताच्या पंतप्रधानांनी पाकिस्तानच्या तपास यंत्रणेला तपास करायची परवानगी दिली होती, पण त्यांनी तपास भलतीकडे नेला. तिथेच पाकिस्तान वरचा विश्वास कायमचा तुटला.
- त्यानंतरच भारताचे धोरण बदलले. कारगिल मध्ये भारताने आपले सैनिक गमावले होते, पण त्यावेळी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा किंवा आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली नव्हती, पण पहलगाम नंतर भारताने आंतरराष्ट्रीय सीमा तर ओलांडलीच, पण पाकिस्तानच्या “पंजाबी हार्ट लँड” मध्ये जाऊन हल्ले केले. भारताच्या बदललेल्या अत्यंत आक्रमक भूमिकेचे ते निदर्शक ठरले.
- पाकिस्तानात दहशतवादी जिथे जिथे जाऊन लपतील, तिथे तिथे जाऊन त्यांना ठोकून काढू, हा संदेश भारताने “ऑपरेशन सिंदूर” मधून दिला.
Pakistan attacks “Punjabi heartland”; Shashi Tharoor hits out at Karan Thapar Operation sindoor
महत्वाच्या बातम्या
- Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!
- Air India : एअर इंडियाने जारी केली अॅडव्हाझरी; जम्मू, लेह, जोधपूरसह सीमावर्ती भागात उड्डाणे रद्द
- Pakistans : पाकिस्तानचा कबूलनामा : भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत ११ सैनिक ठार, ७८ जखमी
- Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?