• Download App
    Pak help for drone attack in JK

    जम्मू – काश्मीरमधील ड्रोन हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात असल्याचे स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी

    जम्मू– ड्रोनच्या साहाय्याने जम्मूतील हवाई तळावर टाकण्यात आलेल्या बॉम्बमधील प्रेशर फ्युजवरून दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्करातील काही घटक किंवा आयएसआयची तांत्रिक साथ मिळाल्याचे स्पष्ट होते. पाक लष्कराकडून अशाच प्रेशर फ्यूजचा वापर केला जातो, असे सुरक्षा सुरक्षा सूत्रांनी सांगितले. Pak help for drone attack in JK



    आईडी किंवा स्फोट घडवून आणणाऱ्या मुख्य भागाचे कवच आणि स्फोटके यांच्यातील जागेत प्रेशर फ्यूजचा वापर केला जातो.  सुरुंग, रणगाडे निकामी करण्यासाठी प्रेशर फ्युजचा वापर केला जातो. या फ्युजवर वाहन अथवा व्यक्तीचा पाय पडल्यास स्फोट होतो. अत्याधुनिक आयईडीमध्ये मात्र बॉम्बच्या पुढील भागावर प्रेशर फ्यूज लावण्यात आला होता. जमिनीवर पडताच जोरात स्फोट व्हावा हा यामागील उद्देश होता.

    लष्करै तैयबाकडून २७ जून रोजी जम्मू विमानतळावरील हवाई दलाच्या इमारतीवर आयईडी (सुधारित स्फोटक साधन) टाकण्यात आले. त्यात एक किलोपेक्षा कमी आरडीएक्स आणि इतर रसायनांचे मिश्रण होते. जमिनीवर टाकण्यात आलेल्या साधनात एक किलोहून जास्त घातक स्फोटके होती. त्यात बॉल बेअरींग्जचाही समावेश होता.

    Pak help for drone attack in JK

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Indian Army : भारतीय लष्कराचा पाकिस्तानला कडक संदेश – “आम्हाला हवा तेव्हा, हवा तिथे हल्ला करू शकतो”

    Operation sindoor : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या संबोधनाकडे संपूर्ण जगाचे लक्ष!!

    Jaipur Police : जयपूरमध्ये महामार्गावर एका पिकअपमध्ये 2075 किलो स्फोटके सापडली; पोलिसांनी वाहन जप्त केले; तपास सुरू