• Download App
    पाकिस्तानच्या ताब्यात ५७७ भारतीय मच्छीमार, तर भारताच्या ताब्यात ७३ पाकिस्तानी मच्छिमार|Pak captured 577 indian fisherman

    पाकिस्तानच्या ताब्यात ५७७ भारतीय मच्छीमार, तर भारताच्या ताब्यात ७३ पाकिस्तानी मच्छिमार

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तानने आपापल्या देशातील आण्विक केंद्रे आणि त्यातील सुविधांची यादी परस्परांना राजनैतिक माध्यमातून सुपूर्द केली. यासोबतच, आपापल्या देशात असलेल्या कैद्यांची यादी देखील दोन्ही देशांनी एकमेकांना दिली आहे. यानुसार पाकिस्तानच्या ताब्यात सुमारे ६०० हून अधिक भारतीय नागरिक असल्याचे सांगण्यात आले.Pak captured 577 indian fisherman

    भारत आणि पाकिस्तान दरम्यान आण्विक केंद्रांच्या माहितीचे आदानप्रदान संभाव्य हल्ल्याच्या प्रतिबंधात्मक कराराअंतर्गत होत असते. याबाबतचा करार ३१ डिसेंबर १९८८ मध्ये करार झाला होता आणि त्याची अंमलबजावणी २७ जानेवारी १९९१ पासून सुरू झाली आहे.



    याअंतर्गत आण्विक केंद्रांची, त्यातील सुविधांची यादी वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच एक जानेवारीला दिली जाते. यासोबतच, दोन्ही देशांनी आपापल्या तुरुंगात असलेल्या कैदी, मच्छीमारांच्या यादीचीही देवाणघेवाण केली.

    यात भारताच्या तुरुंगात असलेल्या २८२ पाकिस्तानी कैद्यांचा आणि ७३ मच्छीमारांचा तपशील पाकिस्तानला देण्यात आला. तर पाकिस्तानकडून भारताला ५१ भारतीय कैद्यांची आणि ५७७ मच्छीमारांची माहिती देण्यात आली.

    Pak captured 577 indian fisherman

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट