वृत्तसंस्था
श्रीनगर : पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याविषयी अनेक बाबी समोर आल्या आहेत. प्राथमिक तपासानुसार हल्ल्याच्या पाच दिवस आधी बैसरन भागात एक अज्ञात डीजेआय मॅट्राइस ३०० आरटीके ड्रोनचे उड्डाण दिसून आले होते. त्याचा वापर विशिष्ट ठिकाणाची पाहणी करणे आणि संभाव्य लक्ष्य (गर्दी) याची निगराणीसाठी केलेला असू शकतो. या भागात असामान्य रेडिओ सिग्नल ट्रॅफिक दिसून आले होते का याविषयीची पडताळणी इस्रोकडून केली जात आहे.
कारण शस्त्रांची खेपही याच ड्रोनने खोऱ्यात पोहोचवण्यात आल्याचा अंदाज आहे. दहशतवाद्यांनी स्थानिक हस्तकांना पैसे देऊन या भागाची रेकी करून घेतल्याचा तपास संस्थांना संशय आहे. पर्यटकांमध्ये मिसळण्यासाठी स्थानिक वेशभूषा व स्थानिक आेळखपत्राचा वापर केला. हल्ल्यानंतर दहशतवादी बैसरनपासून आरू-नगबलच्या वरील जास्त घनतेच्या भागाकडे निघाले. तेथून थेट नगबल नाला, नंतर पश्चिमेकडील खिरम, श्रीशैलम भागापर्यंत जाता येते. आरूच्या वरील छोट्या ट्रेकिंग मार्गाने खोऱ्यात घनदाट भागात पुलवामा वा अनंतनागकडे जाणारे मार्ग आहेत. हल्ल्यानंतर काही तासांत या मार्गावर हालचाली वाढल्या होत्या.
पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी
अत्याधुनिक शस्त्रास्रांचा वापर केला; बैसरन घाटीत अत्याधुनिक शस्त्रांचा वापर झाल्याचे उच्च पदस्थ सूत्रांनी सांगितले. येथे एके-47 राइफल, एम 4ए-1 कार्बाइन, एचके-416 रायफलचे खोके सापडले.
क्रिप्टोकरंसीने रसद पुरवली ; टीआरएफच्या फंडिंग स्रोतांमध्ये ६०% रक्कम क्रिप्टोकरन्सीने पाठवली जात आहे. बिटकॉइन, मोनैरो, यूएसडीटी सारख्या टोकनचा वापर होत आहे. त्याचे धागेदोरे दुबई, मलेशिया,तुर्कीपर्यंत.
आयएसआयच्या कारवाया इंटरसेप्ट; पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय एलओसीच्या पार पाच लॉन्चपॅड्सवर नजर ठेवत आहे. यातील दोन मुजफ्फराबाद आणि तीन नीलम घाटीच्या जवळ आहेत. सुरक्षा एजन्सींनी संचार रिपोर्ट्स व सॅटेलाइट इमेजिंगद्वारे पुष्टी केली आहे.
प्रशिक्षणासाठी मोबाइल कॅम्प ; पाकिस्तानने जुन्या दहशतवाद्यांना डिसमेंटल दाखवले. पण मोबाइल कॅम्प सुरु आहेत.
नौदलाकडून ‘आयएनएस सुरत’ची यशस्वी चाचणी
भारतीय नौदलाने रविवारी अरब सागरात मोठे नौदल सराव केला. ‘आयएनएस सुरत’ याद्वारे यशस्वी क्षेपणास्त्र परीक्षण केले. ७० किलोमीटर क्षेपणास्त्राने समुद्रात लक्ष्यभेद करण्यात यश मिळवले.
हल्ल्याचा नि:पक्ष तपास व्हावा- चीन
भारत-पाक यांच्यातील तणावादरम्यान चीनचे परराष्ट्र मंत्री वाँग यी यांनी रविवारी पाकचे उपपंतप्रधान इशार डार यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर चीनने पाकच्या सुरात सूर मिसळून हल्ल्याचा नि:पक्ष तपास करावा,अशी मागणी केली.
लंडन : पाक उच्चायुक्त अधिकाऱ्याची चौकशी
लंडनमध्ये भारतीय निदर्शकांनी गळा कापण्याची धमकी देणारा पाक उच्चायुक्त अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे. लंडन पोलिसांनी कर्नल तैमूरच्या विरुद्ध चौकशी सुरू केली. घटनेचे व्हिडिओ सोपवले आहेत.
Pahalgam attack case; Terrorists conducted reconnaissance with drones along with local handlers; fled to Pulwama
हत्वाच्या बातम्या
- पहलगाम मध्ये धर्म विचारून हिंदूंची हत्या; तरीही लिबरल पुरोगाम्यांकडून काश्मिरियत आणि मुस्लिमांच्या मदतकार्याची जास्त चर्चा!!
- Ukrainian : युक्रेनच्या राजधानीवर 9 महिन्यांतील सर्वात मोठा क्षेपणास्त्र हल्ला; रशियन हल्ल्यात 8 जण ठार, 70 जखमी
- Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीर: कठुआमध्ये ४ संशयित आढळले, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम