• Download App
    PADMA AWARDS 2021: भारताच्या राष्ट्रपतींची दृष्ट काढणार्या मंजम्मा जोगती ! टाळ्यांच्या कडकडाटात पद्मश्री प्राप्त करणार्या ट्रान्सवुमनची थरारक कहाणी...|PADMA AWARDS 2021: Manjamma Jogati, the President of India! The thrilling story of the transwoman who received the Padma Shri with a round of applause ...

    PADMA AWARDS 2021: भारताच्या राष्ट्रपतींची दृष्ट काढणाऱ्या मंजम्मा जोगती ! टाळ्यांच्या कडकडाटात पद्मश्री प्राप्त करणाऱ्या ट्रान्सवुमनची थरारक कहाणी…

    • पुरस्कार स्वीकारण्याच्या मंजम्मा जोगतीच्या शैलीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
    • मंजम्मा यांना पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी बोलावण्यात आले तेव्हा प्रथम त्यांनी दरबार हॉलच्या मैदानाला स्पर्श केला.त्यानंतर राष्ट्रपती कोविंद यांची आधी दृष्ट काढली .आणि नतमस्तक होऊन त्यांचा सन्मान केला.
    • या क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुम्ही पण पहा.PADMA AWARDS 2021: Manjamma Jogati, the President of India! The thrilling story of the transwoman who received the Padma Shri with a round of applause …

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : जोगम्मा घराण्याच्या ट्रान्सजेंडर लोकनृत्यांगणा आणि कर्नाटक जनपद अकादमीच्या पहिल्या ट्रान्सवुमन मथा बी मंजम्मा जोगती यांनी मंगळवारी पद्मश्री पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आलं.आलं.२०१९ मध्ये, मंजम्मा जोगती कर्नाटक जनपद अकादमीच्या पहिल्या ट्रान्सजेंडर अध्यक्षा झाल्या.

    राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यावेळी मंजम्मा जोगती यांनी पारंपारिक पद्धतीने राष्ट्रपतींना आशीर्वाद दिले. याचा व्हिडिओ एएनआयनं ट्विट केला आहे.

    त्यांनी विविध स्त्री देवतांच्या स्तुतीसाठी इतर कला प्रकार, जनपद गाणी, कन्नड भाषेतील सॉनेटमध्येही प्रभुत्व मिळवले.या कामगिरीसाठी मंजम्मा यांना २०१० मध्ये कर्नाटक राज्योत्सव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2006 मध्ये त्यांना कर्नाटक जनपद अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि २०१९ मध्ये त्यांची संस्थेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. यासह, त्या या पदावर विराजमान होणार्या पहिल्या ट्रान्सजेंडर ठरल्या.

    ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत सरकारने नृत्य क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली होती.

    कोण आहेत मंजम्मा जोगती?

    जोगती नृत्य, जनपद गीत आणि इतर कलाप्रकार टिकवून ठेवण्यासाठी मंजम्मा जोगती या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील काही भागांमध्ये जोगती नृत्य आणि जनपद गीतांची परंपरा अजूनही सुरु आहे.

    मंजम्मा जोगती यांना सन २००६ मध्ये कर्नाटकातील जनपद अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे. त्याचबरोबर सन २०१० मध्ये कर्नाटक सरकारच्यावतीनं त्यांचा वार्षिक कन्नड राज्योत्सव पुरस्कारानं गौरवही करण्यात आला आहे. ही कला आणि संस्कृती शिकून तिचं संवर्धन करण्याचं आवाहन त्यांनी आपल्या समाजाला केलं आहे.

     

    PADMA AWARDS 2021: Manjamma Jogati, the President of India! The thrilling story of the transwoman who received the Padma Shri with a round of applause …

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज

    China : चीन म्हणाला- आम्ही पाकिस्तानसोबत; PAKचा दावा- सैन्याने पेशावरमध्ये भारतीय ड्रोन पाडला