• Download App
    अर्थमंत्री सीतारामन यांच्या पतीची केंद्रावर टीका, सरकार स्वतःची पाठ थोपटण्यात मश्गूल P. Prabhakar lashed on Modi govt.

    अर्थमंत्री सीतारामन यांच्या पतीची केंद्रावर टीका, सरकार स्वतःची पाठ थोपटण्यात मश्गूल

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – कोरोना संकटात पीडित लोकांना मदत करण्याऐवजी सरकार सतत हेडलाइनमध्ये राहण्यात आणि स्वतःचीच पाठ थोपटण्यात मश्गूल आहे, अशी टीका अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती व राजकीय अर्थशास्त्रज्ञ परकला प्रभाकर यांनी केली आहे. P. Prabhakar lashed on Modi govt.

    कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत असताना चाचण्यांचे प्रमाण व लसीकरणात घट होत असल्याबद्दल प्रभाकर यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, परिस्थिती गंभीर असल्याचे डॉक्टर आपल्याला सांगत आहेत. कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण कमी आहे.



    कामाचे ओझे वाढल्याने रुग्णालये व प्रयोगशाळा चाचण्या करण्याचे टाळत आहे. सर्व नमुन्यांची तपासणी ते करीत नाहीत. गेल्या रविवारी केवळ ३.५६ लाख चाचण्या झाल्या. त्याच्या आदल्या दिवशी झालेल्या चाचण्यांपेक्षा ही संख्या सुमारे दोन लाख एक हजारने कमी होती. कोरोनाशी लढा देण्यासाठी आपल्याला ७० कोटी लोकांचे लसीकरण करणे आवश्यकक असून त्यासाठी सुमारे १४० कोटी डोसची गरज आहे.

    ते म्हणाले, गेल्या वर्षी एप्रिलपासून आतापर्यंत सरकार केवळ १९, हजार ४६१ व्हेंटिलेटर, आठ हजार ६३८ आयसीयू खाटा आणि ९४ हजार ८८० ऑक्सिजन खाटांची व्यवस्था करू शकली. राजकीय पक्षांना निवडणुका महत्त्वाच्या आहेत आणि धार्मिक नेत्यांना त्यांची धार्मिक ओळख महत्त्वाची आहे. सार्वजनिक आरोग्य व लोकांच्या आयुष्याशी त्यांना देणेघेणे नाही. काही तज्ज्ञ आणि नेते करीत असलेले निवडणूक प्रचार आणि कुंभमेळ्याचे समर्थन अनाकलनीय आहे.

    P. Prabhakar lashed on Modi govt.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Arunachal Pradesh : रेप-छेडछाडीच्या आरोपीची जमावाकडून पोलिस ठाण्याबाहेर हत्या; 20हून अधिक अल्पवयीन मुलींचे शोषण

    बिहारमध्ये मतदार यादीत आढळले बांगलादेशी, म्यानमारी आणि नेपाळी; पण शेतकरी आणि अल्पसंख्यांकांचे लेबल लावून काँग्रेस लढणार त्यांच्यासाठी!!

    राज्यसभा निवडणुकीसाठी खरी चुरस 2026 मध्ये; कारण निवृत्त होणाऱ्यांमध्ये पवार, देवेगौडा, दिग्विजय सिंह आणि खर्गे!!; पवार पुढे काय करणार??