विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गोवा विधानसभा निवडणुकीचे कॉँग्रेसचे प्रभारी पी. चिदंबरम यांनाच कॉंग्रेसच्या यशाबाबत शंका आहे. निवडणुकीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीची मदत घेऊ असे त्यांनी म्हटले आहे.गोवा विधानसभा निवडणुकीसाठी निवडणुकीपूर्वी आणि निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रीपदासाठीच्या नावाची घोषणा करायची की नाही? उमेदवारांशी चर्चा केली जाईल.P. Chidambaram himself had doubts about the victory of Congress in Goa, said Shiv Sena-NCP will help
ज्या बाजूने मत असेल, त्यानुसार पक्ष निर्णय घेईल, असे सांगून चिदम्बरम म्हणाले, गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत काँग्रेसची आघाडी होऊ शकली नाही. असं असलं तरी आमची मैत्री कायम आहे. निवडणुकीनंतर संधी मिळाल्यास दोन्ही पक्षांसोबत काम करण्याचा काँग्रेस नक्कीच प्रयत्न करेल.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे महाराष्ट्रात काँग्रेसचे मित्रपक्ष आहेत. गोव्यातही ते मित्रपक्ष झाले असते तर काँग्रेसला आवडले असते. आम्ही आमच्या बाजून पूर्ण प्रयत्न केला. त्यांनी काही प्रस्तावर आमच्यासोर मांडले होते. आम्हीही काही प्रस्ताव दिले होते. दुदैर्वाने, आमच्यामध्ये एकमत होऊ शकले नाही.
दोन्ही बाजूंच्या काही मयार्दा होत्या, हे मला मान्य आहे आणि आम्ही सवोर्तोपरी प्रयत्न केले. तरीही आम्ही सोबत येऊ शकलो नाही. पण काही हरकत नाही, आमची मैत्री आहे आणि ती पुढेही कायम राहील. निवडणुकीच्या निकालानंतर संधी मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत काम करण्याचा प्रयत्न करू.
निवडणूक निकालानंतर काँग्रेस इतर पक्षांसोबत आघाडी करणार का? असा प्रश्न चिदम्बरम यांना विचारण्यात आला. यावर चिदंबरम म्हणाले, निवडणुकीच्या निकालानंतर इतर पक्षांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवल्यास, त्यावेळची परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल.
P. Chidambaram himself had doubts about the victory of Congress in Goa, said Shiv Sena-NCP will help
महत्त्वाच्या बातम्या
- कदाचित २०२४ पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतात, कांदा-बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी मोदींना पंतप्रधान केले नाही,
- बालकुमार साहित्य संस्थेतर्फे राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी बालसाहित्य पुरस्कारांचे वितरण
- वाईन आणि दारूमध्ये खूप मोठा फरक, बाळासाहेब थोरातांनी सांगितले शेतकऱ्यांचे फायदे
- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले महात्मा गांधींच्या हत्येला वध म्हणाले, पटोलेंना मानसोपचार रुग्णालयात दाखल करा म्हणत भाजप आक्रमक