• Download App
    धास्तावलेल्या कॉँग्रेसने भावी आमदारांना घातली शपथ, मंदिर- चर्च आणि मशीदीतही नेले|Outraged Congress swore in future MLAs, taking them to temples, churches and mosques

    धास्तावलेल्या कॉँग्रेसने भावी आमदारांना घातली शपथ, मंदिर- चर्च आणि मशीदीतही नेले

    विशेष प्रतिनिधी

    पणजी : गेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरूनही सत्तेपासून दूर राहावे लागले. पाच वर्षांत बहुतांश आमदारांनी पक्षांतर केल्याने संख्या १७ वरून दोनपर्यंत खाली आली. त्यामुळे धास्तावलेल्या कॉँग्रेसने निवडणुकीपूर्वीच भावी आमदारांना शपथ घातली. मंदिर, चर्च आणि मशीदीतही नेऊन निवडून आल्यास पक्षांतर करणार नाही, अशी शपथ त्यांच्याकडून घेण्यात आली.Outraged Congress swore in future MLAs, taking them to temples, churches and mosques

    काँग्रेसने शनिवारी आपल्या सर्व ३४ उमेदवारांना शनिवारी एका विशेष बसने पणजीतील मंदिर, बांबोलिम येथील एक चर्च आणि पणजीनजीकच्या बेतिम खेडय़ातील एका दर्ग्यात नेले. त्यांना पक्षांतरविरोधी शपथ घ्यायला लावली. काँग्रेसचे गोव्यासाठीचे प्रभारी असलेले ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम हे या धार्मिक स्थळी उमेदवारांसोबत होते.



    गेल्या निवडणुकीपासून काँग्रेसचे बहुतांश आमदार पक्ष सोडून गेले आहेत. २०१७ सालच्या विधानसभा निवडणुकीत ४० सदस्यांच्या सभागृहात १७ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसकडे आता फक्त दोन आमदार आहेत. २०१९ साली काँग्रेसच्या १० आमदारांनी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे भाजपचे सभागृहातील सध्याचे संख्याबळ २७ आहे.

    लोकांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी, उमेदवारांना ईश्वरापुढे शपथ घेण्याचा प्रयोग करण्यात आला, असे गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले.
    गेल्या वर्षी ३१ जानेवारीला गोवा फॉर्वर्ड पाटीर्ने (जीएफपी) त्यांचे तिन्ही आमदार व पदाधिकारी यांना मापुसा येथील देव बोडगेश्वर मंदिरात नेऊन,

    आपण २०२२ सालच्या निवडणुकांत भाजपला पाठिंबा देणार नाही अशी शपथ घ्यायला लावली होती. मात्र अशी शपथ घेऊनही जयेश साळगावकर या आमदाराने नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या ते सालिगाव मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत.

    Outraged Congress swore in future MLAs, taking them to temples, churches and mosques

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य