• Download App
    केरळमध्ये बर्ड फ्ल्यूचा उद्रेक, महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत आला रोग|Outbreak of bird flu in Kerala, the disease has reached the border of Maharashtra

    केरळमध्ये बर्ड फ्ल्यूचा उद्रेक, महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत आला रोग

    विशेष प्रतिनिधी

    तिरुवअनंतपुरम  : काही वर्षांपूर्वी झालेल्या बर्ड फ्ल्यूच्या उद्रेकाची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली आहे. केरळमध्ये बर्ड फ्ल्यूचा उद्रेक झाला असून महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत रोग आला आहे. अनेक ठिकाणी कोंबड्या आणि बदकांना मारणे सुरू झाले आहे.Outbreak of bird flu in Kerala, the disease has reached the border of Maharashtra

    केरळमधील अलाप्पुझा जिल्ह्यातील थाकाझी पंचायत  मधून बर्ड फ्लूचा  प्रसार झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.  पुरक्कडमधून पाठवण्यात आलेल्या बदकांमध्ये बर्ड फ्लू असल्याची पुष्टी झाली आहे. याबाबत माहिती मिळताच अधिकाºयांनी प्रभावित भागात एक किलोमीटरपर्यतच्या भागातील बदके, कोंबड्या आणि घरेलू पक्षांना मारण्याचे आदेश दिले आहेत.



    फ्लूच्या  प्रकोपाची सूचना मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी पशूपालन, आरोग्य आणि पोलिस विभागातील अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली. प्रशासनाने थाकाझी ग्राम पंचायत वॉर्ड क्रमांक 10 जवळील एक किमी भागातील सर्व बदके, कोंबड्या आणि घरेलू पक्षांना मारण्याचे आदेश दिले.

    संक्रमण पसरू नये म्हणून प्रशासनाकडून हे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय जिल्हाधिकाºयांनी फ्लू संभावित भागातील कोंबड्या, बदके आणि पक्षांचे अंडे, मांस आदीच्या विक्रीवर बंधने घातली आहेत.

    प्रशासनाने चंपाकुलम, नेदुमुडी, मुत्तर, वियापुरम, करुवट्टा, थ्रीकुन्नपुझा, थकाझी, पुरक्कड़, अंबालापुझा दक्षिण, अंबालापुझा उत्तर हरिप्पड नगरपालिका भागात प्रतिबंध लावण्यात आले आहेत. यासोबतच प्रशासनाने या भागातील पक्ष्यांना पकडणे आणि त्यांना नष्ट करण्यासाठी पशूपालन विभागाचे पथक तयार केले आहे.

    नुकतेच मध्य प्रदेशातील आगर मालवा जिल्ह्यातून कमीत कमी 48 कावळे मृत अवस्थेत आढळल्यानंतर यात एच5 एन8 व्हायरस म्हणजेच बर्ड फ्लूची पुष्टी झाली होती. याशिवाय राजस्थानमधील नागोर जिल्ह्यातूनही बर्ड फ्लूची प्रकरणं समोर आली आहेत. ज्यात 5 दिवसात 60 हून अधिक कावळ्यांचा मृत्यू झाला होता.

    Outbreak of bird flu in Kerala, the disease has reached the border of Maharashtra

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कर्नाटकात मुख्यमंत्र्यांची खुर्ची टिकवायची मारामार; पण त्यांना आता आठवला प्रोटोकॉल!!

    Kavinder Gupta : लडाखमध्ये LG आणि हरियाणा-गोव्यात नवीन राज्यपालांची नियुक्ती; कविंदर गुप्ता यांना केंद्रशासित प्रदेशाची जबाबदारी

    India iphone : भारतात आयफोन बनवणाऱ्या अभियंत्यांना चीनने परत बोलावले; केंद्र सरकारने म्हटले- ॲपलकडे अजूनही पुरेसे अभियंते