• Download App
    स्वातंत्र्ययुध्दातल्या शूर आदिवासींच्या योगदानाची पुरेशी दखल नाही; पंतप्रधानांची खंत; केंद्र सरकार बांधतेय ९ राज्यांमध्ये आदिवासी योध्द्यांची स्मारके Our tribal community played a major role in the freedom struggle but their sacrifices

    स्वातंत्र्ययुद्धातल्या शूर आदिवासींच्या योगदानाची पुरेशी दखल न घेतल्याची पंतप्रधानांना खंत; केंद्र सरकार बांधतेय ९ राज्यांमध्ये आदिवासी योद्ध्यांची स्मारके

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात शूर आदिवासींच्या योगदान फार मोठे आहे. त्यांनी उभारलेले लढे दीर्घ होते आणि ब्रिटिशांना हादरविणारे होते. परंतु, या शूर आदिवासींच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाची पुरेशी दखल घेतली नव्हती, अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली. Our tribal community played a major role in the freedom struggle but their sacrifices

    जालियानवाला बागेच्या हुतात्म्यांचे स्मारक पंतप्रधानांनी आज देशाला समर्पित केले. तेव्हा ते बोलत होते. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.



    स्वातंत्र्य लढ्यात आदिवासींच्या योगदानाचा पंतप्रधानांनी उचित शब्दांमध्ये गौरव केला. शूर आदिवासी स्वातंत्र्य योध्द्यांच्या स्मरणार्थ देशाच्या ९ राज्यांमध्ये स्मारके उभारण्याचे काम जोरात सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ही सर्व स्मारके पूर्ण करून देशाला समर्पित होणे अपेक्षित आहे.

    प्रख्यात क्रांतिकारक शहीद भगत सिंग आणि शहीद उधम सिंग यांच्या सारख्या अनेक क्रांतिकारकांना ज्या बलिदानातून आत्मबलिदानाची प्रेरणा मिळाली, त्या जालियानवाला बागेचे स्मारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला समर्पित केले.

    पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंतप्रधानांकडे शहीद उधमसिंग यांचे पिस्तुल आणि डायरी ब्रिटिशांच्या ताब्यातून भारतात परत आणण्याची मागणी केली. याबाबत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहिल्याची आठवण अमरिंदर सिंग यांनी करून दिली. शहीद उधम सिंग यांनी मायकल ओ डायर या जालिवायनवाला बागेत निशःस्त्र भारतीयांचे हत्याकांड करणाऱ्या ब्रिटिश जुलमी अधिकाऱ्याला लंडनमध्ये भर कार्यक्रमात गोळ्या घालून मारले होते. जालियानवाला हत्याकांडाचा सूड घेतला होता. त्या शहीद उधम सिंग यांचे पिस्तुल आणि डायरी आजही ब्रिटिशांच्या ताब्यात आहे. या ऐतिहासिक महत्त्वाच्या वस्तू भारतात परत आणण्याची मागणी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केली आहे.

    Our tribal community played a major role in the freedom struggle but their sacrifices

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य