विशेष प्रतिनिधी
दिल्ली : 2014 मध्ये भाजपसाठी इलेक्शन कॅम्पेनचे नियोजन करणारे निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी एक वक्तव्य केले आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधी पक्षांच्या आघाडीचे समर्थन करताना, एक मजबूत संघटन उभे करून भाजपला हरवता येऊ शकते, अशी भूमिका मांडली होती.
Opposition’s lead is not enough to defeat BJP: Prashant Kishor
प्रशांत किशोर यांनी या भूमिकेवर आपले मत व्यक्त केले आहे. इंडिया टुडेसोबत बोलताना प्रशांत किशोर यांनी या भूमिकेवर आपले मत मांडताना म्हटले आहे की, फक्त विरोधकांनी एकत्र येणे हे भाजपला हरवण्यासाठी अजिबात पुरेसे नाहीये. भाजपविरोधी एकत्र येणे, मजबूत संघटन उभे करणे याचा काहीही उपयोग होणार नाही. भाजपविरुद्ध निवडणूक जिंकणे हे पूर्णपणे एक वेगळी गोष्ट आहे.
हे सांगताना त्यांनी उत्तर प्रदेशच्या निवडणुकांचे उदाहरण दिले. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी, बसपा आणि इतर पक्षांनी मिळून भाजपविरोधात निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीमध्ये भाजपच विजयी झाले होते. त्यामुळे त्यांनी भाजप विरोधी पक्षाने एकत्र येणे हा विजयाचा मूलमंत्र होऊ शकत नाही, असा स्पष्ट इशारा काँग्रेसला दिला आहे.
पुढे ते म्हणतात की, भाजपला विरोध करण्यासाठी तुमच्याकडे एक चेहरा असायला हवा. एक नॅरेटीव्ह असायला हवं. त्यानंतर ह्या इतर गोष्टी येतात.
Opposition’s lead is not enough to defeat BJP: Prashant Kishor
महत्त्वाच्या बातम्या
- OMICRON : युरोपात कोरोनाचा कहर ; इंग्लंडमध्ये एका दिवसांत 88 हजार
- तेरे नाम से सुरू, तेरे नाम पे खतम, माझी निष्ठा व राजकारण हे राजसाहेब यांना अर्पित असल्याचे बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले
- अभिनेत्री अलिया भट्टवर होणार कारवाई, हाय रिस्क संपर्कात येऊनही होम क्वारंटाईनचा भंग
- विद्यापीठाचे करोडो रुपयांचे मोकळे भूखंड ठाकरे सरकारचे लक्ष्य, आता कुलगुरू युवा सेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये ठरविणार, आशिष शेलार यांचा आरोप
- काका- पुतण्याची युती, मात्र स्वत;च्या पक्षांची ओळख कायम ठेऊन सोबत लढणार