• Download App
    विरोधकांचे बाउन्सर फेल; शिंदे - फडणवीसांची तगडी बॅटिंग; सरकारच्या सर्व विकेट शाबूत Opposition parties MVA failed to corner shinde Fadanavis government over all issues in winter session of maharashtra legislature

    विरोधकांचे बाउन्सर फेल; शिंदे – फडणवीसांची तगडी बॅटिंग; सरकारच्या सर्व विकेट शाबूत

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपण्याच्या आदल्या दिवसापर्यंत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर जोरदार बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला, पण शिंदे – फडणवीस यांनी जोरदार बॅटिंग केल्याने महाविकास आघाडीचे हे सगळे बाउन्सर्स फेल गेले आणि सरकारच्या सगळ्या विकेट शाबूत राहिल्या. Opposition parties MVA failed to corner shinde Fadanavis government over all issues in winter session of maharashtra legislature

    मागच्या ठाकरे – पवार सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेते पदाचा किल्ला एक हाती लढवत अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राठोड या मंत्र्यांच्या तगड्या विकेट काढल्या होत्या. त्यांनी ठाकरे – पवार सरकारला कोंडीत पकडून मंत्र्यांना राजीनामा द्यायला लावले होते. त्यातल्या 2 मंत्र्यांना तर तुरुंगात घालून दाखविले होते. त्यातले फक्त देशमुख बाहेर येऊ शकले. नवाब मलिक आतच आहेत.

    आता त्याचा वचपा काढण्याची संधी महाविकास आघाडीला आली होती. महाविकास आघाडीने अब्दुल सत्तार, संजय राठोड यांच्या विकेट काढण्याचे टार्गेट देखील निश्चित केले होते. गायरान जमिनीच्या वाटपाचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी अधिवेशन काळात लावून धरला. त्यांना राष्ट्रवादीच्या काही आमदारांची जरूर साथ मिळाली. पण विधिमंडळाबाहेर सरकार खाली बॉम्ब फोडण्याच्या भाषा करणे, पायऱ्यांवर भजने करणे, 50 खोकेच्या घोषणा देणे या खेरीज विरोधक फारसे प्रभावी ठरू शकले नाहीत. महाविकास आघाडी शिंदे – फडणवीस सरकारच्या एकाही मंत्र्याचा राजीनामा घेऊ शकली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी हार्ड विकेट काढून दाखवल्या पण महाविकास आघाडीच्या नेत्यांना सॉफ्ट विकेट सुद्धा काढता आल्या नाहीत.

    अधिवेशनाचा उद्या 30 डिसेंबर 2022 रोजी अखेरचा दिवस आहे. या अखेरच्या दिवशी विरोधक काय करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



     शिंदे – फडणवीस यांची तगडी बॅटिंग

    त्याच वेळी अंतिम आठवडा प्रस्तावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत देखील बॅटिंग करून घेतली. आमच्या मंत्र्यांवर आरोप करून तुम्ही काय मिळवलेत?, नुसतेच आरोप करून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आरडाओरडा करून काही साध्य होणार नाही, असे विरोधकांना सुनावले. त्या उलट समृद्धी महामार्गासह सरकारने केलेल्या सर्व कामांचा पाढा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाचला आणि उद्धव ठाकरेंना देखील टोले हाणले. कोरोना आणि लॉकडाऊन कुणाचे आवडते विषय आहेत, हे अजितदादा तुम्हाला माहिती आहे. सरकार बदलले म्हणून निदान हिवाळी अधिवेशन तरी नागपुरात झाले, असे ते अजित पवारांना उद्देशून म्हणाले, तरी तो टोला उद्धव ठाकरे यांना बसला.

     पवारांनी अजितदादांना मुख्यमंत्री केले नाही

    देवेंद्र फडणवीस यांनी नॉन स्ट्रायकर एन्ड वरून स्ट्रायकर एन्डला येत अजितदादांसह शरद पवारांनाही जोरदार टोला हाणला. 2004 मध्ये राष्ट्रवादीला जेव्हा मुख्यमंत्रीपदाची संधी आली होती, तेव्हा शरद पवारांनी अजित पवारांना मुख्यमंत्री केले नाही, असे फडणवीसांनी विधानसभेत जाहीरपणे सांगितले. या उलट सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने जयंत पाटलांचे निलंबन करून आघाडीचीच विकेट काढली. एक प्रकारे जयंत पाटलांनी निर्लज्जपणा हा शब्द वापरून स्वतःचीच हिट विकेट शिवसेना भाजप युती सरकारला बहाल केली.

    तर अतुल भातखळकरांनी सुभाष देसाई यांचा 3000 कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा बाहेर काढून त्याची चौकशी लावायला सरकारला भाग पाडले आता याचा चौकशी अहवाल पुढच्या अधिवेशनात सादर करू असे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिले आहे. त्यामुळे पुढचे अधिवेशनही रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत.

    Opposition parties MVA failed to corner shinde Fadanavis government over all issues in winter session of maharashtra legislature

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!

    Judge Verma bench : जज वर्मा खंडपीठाच्या खटल्यांची पुन्हा सुनावणी होणार; 50 हून अधिक खटले प्रलंबित

    Sharad Pawar NCP : पवारांच्या पक्षाची अवस्था चव्हाण + रेड्डी काँग्रेस सारखी; त्यांच्या राष्ट्रवादीच्या गळतीतून अजितदादांच्या राष्ट्रवादीची भरती!!