वृत्तसंस्था
चंदीगड : पंजाबमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये २० माजी कॅबिनेट मंत्री, आमदार, खासदार, सेलिब्रिटी दाखल होणार आहेत. Opposition in Punjab joins in BJP ; Former MLAs including twenty former ministers, MPs will join the party
वृत्तसंस्थेनुसार, काँग्रेससह आम आदमी पक्ष, शिरोमणी अकाली दल व राष्ट्रीय समाजवादी काँग्रेसमधील ही सर्व नेतेमंडळी आहेत. त्यामध्ये चार प्रसिध्द गायक आहेत. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी भाजपशी हातमिळवणी केली असून त्यांची आघाडी पंजाबमध्ये काँग्रेस व अकाली दलाला टक्कर देणार आहे.
भाजपमधील सुत्रांच्या माहितीनुसार, पुढील आठवडाभरात हा जंबो पक्ष प्रवेश होणार आहेत. दहशतवाद ड्रग्ज आदी मुद्यांवरून सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात जनतेत मोठा रोष आहे. विरोधकही त्यांच्या त्यांच्या पक्षाला कंटाळले असून निवडणुकीपूर्वी भाजप पक्ष प्रवेश मोहीम टप्प्याटप्प्यात राबविण्यात येणार आहे. त्यामुळे भाजपची ताकद राज्यात वाढणार असल्याचे संकेत मिळू लागले असून सत्ताधारी काँग्रेसला जनता विटली आहे. आता जनता भाजपकडे एकमेव आशा म्हणून पाहत आहे.
अमरिंदरसिंग यांनी काँग्रेस सोडल्यानंतर राज्यातील राजकीय चित्र बदलले आहे. शेतकरी आंदोलनामुळे भाजपविरोधात राज्यात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. पण आता कायदे मागे घेतल्याने तसेच अमरिंदरसिंग भाजपसोबत गेल्याने काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. काँग्रेसमध्ये नवज्योतसिंग सिध्दू यांच्याविषयी काही गट नाराज आहे. त्यामुळे आगामी निवडणूक काँग्रेसला जड जाणार आहे.
Opposition in Punjab joins in BJP ; Former MLAs including twenty former ministers, MPs will join the party
महत्त्वाच्या बातम्या
- जय भीम, जम्मू आणि काश्मीरमध्ये अनुसुचित जाती-जमातींना मिळणा आरक्षण
- एक तर जुनी वाहने इलेक्ट्रिक करून घ्या, अन्यथा स्क्रॅप करा; १ जानेवारीपासून दिल्लीत नवा नियम
- सुनेच्या ईडी चौकशीमुळे सासूबाई संतापल्या, मोदी सरकारला जया बच्चन यांनी दिला शाप
- अश्व विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल घोडे बाजारासाठी प्रसिद्ध सारंगखेडा यात्रेला सुरुवात