• Download App
    आधीपासून EVM वर थयथयाट; आता मतदानाच्या 7 टप्प्यांवरून खणखणाट; विरोधकांच्या निवडणूक तयारीचाच मूळात खडखडाट!!|Opposition first cried on EVM, now it is crying over 7 phases of voting

    आधीपासून EVM वर थयथयाट; आता मतदानाच्या 7 टप्प्यांवरून खणखणाट; विरोधकांच्या निवडणूक तयारीचाच मूळात खडखडाट!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आधीपासून EVM थयथयाट; आता मतदानाच्या 7 टप्प्यांवरून खणखणाट; विरोधकांच्या निवडणूक तयारीचाच मूळात खडखडाट!!, अशीच अवस्था सर्व विरोधकांची आज निवडणुका जाहीर झाल्यानंतर झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करताना 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार असल्याचे स्पष्ट केले. विरोधकांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वर घेतलेल्या आक्षेपांना त्यांनी शेरोशायरीतून पण समर्पक उत्तर दिले. हे समर्पक उत्तर ऐकून खवळलेल्या विरोधकांनी आता मतदानाच्या 7 टप्प्यांवर आक्षेप घेणारी वक्तव्ये केली.Opposition first cried on EVM, now it is crying over 7 phases of voting



    पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जींचा सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे नेते निवडणूक आयोगावरच खवळले. पश्चिम बंगाल मध्ये भाजपशासित राज्यांपेक्षा कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चांगली असताना खरं म्हणजे राज्यात एकाच टप्प्यात मतदान व्हायला हवे होते. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली असती, पण निवडणूक आयोगाने मुद्दामून राज्यात 7 टप्प्यांमध्ये मतदान घेण्याचे जाहीर केले. राज्यामध्ये कारण नसताना केंद्रीय राखीव दलाची पथके पाठवून दिली. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न असल्याचा आभास त्यातून निवडणूक आयोगाने निर्माण केला. केंद्रातल्या मोदी सरकारला आणि सत्ताधारी भाजपला हवे तसेच वेळापत्रक निवडणूक आयोगाने आखले, असा आरोप तृणामूळ काँग्रेसचे नेते सुगता रॉय आणि मंत्री चंद्रमा भट्टाचार्य यांनी केला.

    कर्नाटकातले काँग्रेसचे नेते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांनी तृणमूळ काँग्रेसचाच कित्ता गिरवला. देशात 7 टप्प्यांमध्ये मतदान घेण्याची काहीच गरज नव्हती. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनुकूल नॅरेटिव्ह सेट होईल, अशाच पद्धतीने निवडणूक आयोगाने निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. मोदींच्या मोठमोठ्या रॅली आणि रोड शो ला व्यवस्थित वेळ पुरावा या हेतूनेच 7 टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. निवडणूक आयोग मोदींनी खिशात घातल्याचाच हा परिणाम आहे. या प्रतिकूल वातावरणात काँग्रेस आणि “इंडिया” आघाडी निवडणुकीला सामोरे जाईल, असे वक्तव्य प्रियांक खर्गे यांनी केले.

    काँग्रेस पासून सगळेच विरोधक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वर आक्षेप घेतच होते. पण त्यावरून मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शेरोशायरी मधून विरोधकांना टोला हाणला होता. तुमच्या अपूर्ण इच्छांचे खापर ईव्हीएम वर फोडू नका, असा त्याचा आशय होता. मुख्य निवडणूक आयुक्तांचा हा टोला काँग्रेस सकट सगळ्या विरोधकांना चांगलाच झोंबला. त्यामुळे त्यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वर तेच ते रडगाणे गायचे सोडून देऊन मतदानाच्या 7 टप्प्यांवर आक्षेप घेणारी वक्तव्ये जारी केली.

    Opposition first cried on EVM, now it is crying over 7 phases of voting

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही