विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : विरोधक वार करत राहिले आणि मोदी काम दाखवत राहिले…!! अशी गेल्या दोन आठवड्यातली राजधानी दिल्लीतली राजकीय कहाणी आहे.विरोधकांनी एकही दिवस संसदेचे कामकाज गोंधळाविना पार पडू दिले नाही. पेगासस हेरगिरी आणि कृषी विधेयकांच्या मुद्द्यांवरून सर्व विरोधक सरकारवर प्रहार करत राहिले, पण ते सगळे त्यांच्याच गदारोळामुळे वाया गेले.Opposition attack on modi government turned in vain as PM Modi remained in public contact through his government programs
मोदी सरकारला साधी खरोचही आली नाही. उलट विरोधक या संपूर्ण पंधरवड्यात स्वतःच्या राजकीय कर्तृत्वाने exposed झाले. लोकशाही वाचवण्याचा धोशा त्यांनी लावला पण तो संसदेबाहेर. प्रत्यक्ष संसदेत राज्यसभेतल्या टेबलवर ते नाचलेले जनतेला दिसले.
उलट पंतप्रधान मोदी मात्र आपले नियोजित काम करत राहिले. नियोजित कामाची त्यांची निवड देखील अशी चपखल होती की विरोधक संसदेत काय करताहेत?, ते गोंधळ घालून कसे exposed होत आहेत ना? ते परस्पर घडते आहे ना?, एवढेच बघून मोदी आपल्या कामाकडे वळत होते.
मोदींची कामे
- मोदींच्या गेल्या आठवड्यातल्या सार्वजनिक कार्यक्रमांची नुसती यादी जरी बघितली तरी मोदींचा राजकीय कामाचा आवाका लक्षात येईल.
- मोदींनी गेल्या दोन आठवड्यांमध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र इथल्या विविध सरकारी योजनांमध्ये लाभार्थ्यांशी चर्चा केली.
- यात शेतकरी आणि महिलावर्गाला प्राधान्य दिले. यांनी किसान सन्मान निधीचे 19750 कोटी रूपयांचे वाटप केले. उज्ज्वला योजना २ चे उद्घाटन केले.
- आंतरराष्ट्रीय पातळीवर तर पंतप्रधान मोदींनी जो राजकीय षटकार मारला त्याला तोड नाही. चीनच्या इच्छेविरोधात त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत आंतरराष्ट्रीय सागर सागरी सुरक्षेसंदर्भात चर्चा घडवून आणली.
- रशियाचे अध्यक्ष वलादिमिर पुतीन आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकेन यांना सुरक्षा समितीच्या फोरमवर चीन विरोधात एकत्र आणले. ही काही लहान-सहान कामगिरी नव्हे…!!
विरोधक संसद बंद पाडत असता मोदींनी हे करून दाखवले आहे. संसद चालू असो अथवा नसो मोदींनी सरकारच्या ठाम भूमिकेत तडजोड केली नाही. जनता संपर्कात त्यांनी कोठेही अडथळा आणू दिला नाही. उलट संसद बंद पडत राहिल्यामुळे विरोधकांची प्रतिमा डागाळत राहील, हेच त्यांनी अप्रत्यक्ष रीतीने पाहिले. यातून विरोधकांनाही राजकीयदृष्ट्या तर काही साध्य करता आले नाहीच, पण मोदी सरकारच्या अंगावरचे सगळे वार वाया गेलेले दिसले…!!
Opposition attack on modi government turned in vain as PM Modi remained in public contact through his government programs
महत्त्वाच्या बातम्या
- सेक्स गुलाम बनविण्यासाठी तालीबान अफगणिस्थानातील घराघरात मुली आणि विधवांचा घेतेय शोध
- अभिनेते प्रशांत दामले राज्य सरकारवर संतप्त, मोगॅँबो खुश हुआ म्हणत हॉटेल-मॉल्स मालकांचे अभिनंदन करत साधला निशाणा
- शिक्षणसम्राट मंत्र्यांना सामान्यांपेक्षा आपल्या संस्थांचीच काळजी, १५ टक्के फी कपातीवरून मंत्रीमंडळ बैठकीत खडाजंगी
- Maharashtra Unlock : 15 ऑगस्टपासून लॉकडाऊन मधून ‘स्वातंत्र्य’; टास्क फोर्सचा शाळा, महाविद्यालयं सुरू करण्यास विरोध