• Download App
    Operation Sindoor भारताने केलेला हल्ला "खूप मोठा", पण प्रेस ब्रीफिंग मध्ये वापरली "मोजून मापून" भाषा; याचा नेमका अर्थ काय??

    Operation sindoor : भारताने केलेला हल्ला “खूप मोठा”, पण प्रेस ब्रीफिंग मध्ये वापरली “मोजून मापून” भाषा; याचा नेमका अर्थ काय??

    नाशिक : पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानात दहशतवादी ठिकाणांवर खूप मोठा हल्ला केला. पण प्रत्यक्षात प्रेस ब्रिफिंग मध्ये भाषा अतिशय “मोजून मापून” वापरली, जी आंतरराष्ट्रीय स्तरावर आवश्यक होती. त्यामुळे भारतीय हल्ल्याला चीन सकट कुठलाही देश ठाम विरोध करू शकला नाही. इजरायलने भारतीय हल्ल्याचे समर्थन केले, तर चीनने भारतीय हल्ल्याबद्दल फक्त “खेद” प्रकट केला. अमेरिका परिस्थितीवर फक्त “नजर” ठेवून राहिली.

    भारताने पाकिस्तान मध्ये 9 शहरांमधल्या 21 दहशतवादी केंद्रांवर हल्ले केले. त्यामध्ये सगळी अत्याधुनिक वेपनरी वापरली. लष्कर ए तोयबा, हिजबुल मुजाहिदिन आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनांची मुख्यालये उडवली. हाफिज सईद आणि मसूद अजहर याचे नातेवाईक मारले. साधारण 80 ते 100 दहशतवादी या हल्ल्यात मारले गेले.

    परंतु, भारताने मारले गेलेल्या दहशतवाद्यांचा कुठलाही आकडा अधिकृतरित्या जाहीर केला नाही. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्या समवेत दोन महिला अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारतीय फौजांनी एकत्रितरित्या केलेल्या सर्व हल्ल्याची तपशीलवार माहिती दिली. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल यांनी संयुक्तपणे “ऑपरेशन सिंदूर” ही मोहीम राबविल्याचे सांगितले. पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि प्रत्यक्ष पाकिस्तानात नेमके कुठे आणि किती हल्ले केले हे नकाशा सकट दाखविले, पण दहशतवादी मारले गेल्याचा आकडा मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवला. त्याचबरोबर हल्ल्यामध्ये नेमकी कुठली वेपनरी वापरली हे देखील सांगितले नाही.‌ भारताने पाकिस्तानी लष्करावर किंवा पाकिस्तानी नागरिकांवर हल्ला केला नाही. फक्त दहशतवादी केंद्रांवर आणि दहशतवाद्यांवरच हल्ला केला, असे स्पष्ट बजावले.

    भारताच्या या अधिकृत ब्रीफिंगमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची पुरती पंचाईत झाली. भारताने हल्ला केल्यानंतर पाकिस्तानच्या लष्करी प्रवक्त्याने घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्याने आठ पाकिस्तानी नागरिक मारले गेल्याचा दावा केला. त्यात एका लहान मुलीचाही समावेश करून टाकला. परंतु, प्रत्यक्षात त्याने कुठला पुरावा त्यावेळी सादर केला नाही. त्यामुळे पाकिस्तानी लष्करी प्रवक्त्याच्या पत्रकार परिषदेला आंतरराष्ट्रीय पातळीवर गांभीर्याने घेतले गेले नाही.

    भारतीय माध्यमांनी मात्र वेगवेगळ्या सूत्रांच्या हवाल्याने मोठ्या बातम्या चालवून मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड मसूद अजहर आणि हाफिज सईद यांचे नातेवाईक मारले गेल्याच्या बातम्या दिल्या. मुजफ्फराबाद मधल्या मरकज अल्लाह मध्ये मसूद अजहरचे 14 नातेवाईक राहत होते सगळे भारतीय हल्ल्यात मारले गेले. मुरिदके मध्ये हाफिज सईदचा मुलगा राहत होता, तो देखील हल्ल्यात मारला गेला. पण भारतीय प्रवक्त्यांनी या बातम्यांना दुजोरा दिला नाही, पण त्याचबरोबर त्या बातम्यांचा इन्कारही केला नाही.

    याचाच नेमका अर्थ असा की भारताने अतिशय “पीन पॉईंटेड प्रिसिजन अटॅक” केले. त्यामध्ये दहशतवाद्यांचे प्रचंड नुकसान केले. दहशतवाद्यांचे बळी घेतले. त्यांचे म्होरके मारले. पण भारताने पाकिस्तानवर हल्ला केला किंवा पाकिस्तानी लष्करावर हल्ला करून आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग केला किंवा पाकिस्तानी निरपराध नागरिकांना मारले, अशी कुठलीही प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण होऊ दिली नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांना भारताने आणखी हल्ले केले नाहीत तर पाकिस्तान प्रत्युत्तर देणार नाही, हे सांगावे लागले. भारताचे हे सैन्य आणि राजनैतिक पातळीवरचे सगळ्यात मोठे यश ठरले.

    पण या सगळ्यामध्ये भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी वेगळ्या पद्धतीने कळस चढविला. त्यांनी फक्त “पिक्चर अभी बाकी है”, एवढ्या चारच शब्दांचे ट्विट केले!! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला प्रस्तावित युरोप दौरा रद्द केला.

    Operation Sindoor was launched by the Indian Armed Forces to deliver justice to the victims of the Pahalgam terror attack

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये जवानांनी २२ नक्षलवाद्यांना केले ठार, १८ जणांचे मृतदेह सापडले

    Singer Adnan Sami : गायक अदनान सामीचा खुलासा- पाकिस्तानी मुले त्यांच्या सैन्याचा तिरस्कार करतात; देश उद्ध्वस्त केल्याचा आरोप

    Rashid Alvi : ‘प्रत्येक दहशतवादी मारला गेला का, दुसरा पहलगाम होणार नाही?’