• Download App
    Operation sindoor पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या

    Operation sindoor : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या संबोधनाकडे संपूर्ण जगाचे लक्ष!!

    Operation Sindoor

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : Operation sindoor भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीरपणे देशासमोर येणार आहेत. आज रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. पण मोदींच्या या भाषणाची सगळ्यात जगात उत्सुकता लागून राहिली आहे.Operation sindoor

    ऑपरेशन सिंदूर मोहिमेमध्ये भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तानला अवघ्या चार दिवसांमध्ये गुडघे टेकायला लावले. भारताच्या फौजांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठ्यापर्यंत धडक मारली. त्यामुळे अमेरिका चीन सकट सगळे जग घाबरले. पण भारतीय नेतृत्वाने आणि सैन्य दलांनी संयम राखून लष्करी कारवाई थांबवली. पण ऑपरेशन सिंदूर सुरू ठेवले.



    भारतीय सैन्य दलांच्या DGMO नी दोन दिवस पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरची सविस्तर माहिती पुराव्यांसह दिली. भारताने ठरविलेल्या नुसारच आपल्या पद्धतीने पाकिस्तानला ठोकले चीन आणि तुर्कस्तानची मिसाईल्स आणि ड्रोन्स पाडली. भारतीय सैन्य दलांनी अत्युच्च तंत्रज्ञानाचा अचूक आणि संहारक वापर केला.

    या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री आठ वाजता देशातील जनतेला संबोधित करणार आहेत. पण ते नेमके काय बोलणार??, याची सगळ्या जगाला उत्सुकता लागून राहिली आहे.

    भारताने पाकिस्तानच्या किराणा हिल्स वरील अण्वस्त्रांना धक्का लावला का??, भारतीय हवाई दलाच्या DGMO चे “कानावर हात”!!

    ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय हवाई दलाने इस्लामाबाद आणि रावळपिंडी नजीक नूर खान हवाई तळावर अचूक हल्ला करून मारा केल्यानंतर “अचानक” भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली. नूर खान हवाई तळावरील हल्ला यात turning point ठरल्याचे बोलले गेले, कारण त्याच्या नजीकच्याच किराणा हिल्स वरील अण्वस्त्रांना भारताने धक्का लावल्याचे मानले गेले. त्यातून पाकिस्तानात अणू किरणोत्साराचा म्हणजेच atomic radiation चा धोका वाढला. अमेरिकेच्या विमानाला तिथे टेहळणी करावी लागली. पाकिस्तानात रेडिएशन विरोधी बोरॉन मूलद्रव्य मागवावे लागले. ते इजिप्शियन विमानातून तिथे पोहोचले.

    *या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य दलांच्या तिन्ही डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (DGMO) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एअर मार्शल ए. के. भारती यांना प्रश्न विचारण्यात आला भारतीय हवाई दलाने किराणा हिल्स वरील पाकिस्तानी atomic installations ना धक्का लावलाय का??, त्यावर एअर मार्शल ए. के. भारती म्हणाले, “thank you very much किराणा हिल्स वर पाकिस्तानचे atomic installations आहेत, हे तुम्ही आम्हाला सांगितले. आम्हाला ते “माहिती” “नव्हते”, पण‌ भारतीय हवाई दलाने जी काही किराणा हिल्स आहे, तिथे कुठेही हल्ला केला नाही. तसे माझ्या कालच्या ब्रीफिंग मध्ये नव्हते आणि आजच्या ब्रीफिंग मध्येही नाही!!””

    मात्र “असे” उत्तर देऊन एअर मार्शल भारती यांनी अप्रत्यक्षपणे कानावर हात ठेवले. भारती यांच्या या उत्तरानंतर पत्रकार परिषदेत हास्याची लकेर पसरली. त्यामुळे सगळ्यांना भारती यांच्या उत्तरा मधले between the lines व्यवस्थित लक्षात आले.

    – इस्लामाबाद ते कराची हवाई हल्ले

    एअर मार्शल भारती यांनी आजच्या पत्रकार परिषदेत नकाशे आणि फोटो दाखवून भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यांची तपशीलवार माहिती दिली. भारतीय हवाई दलाने सुरुवातीला 7 पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ले केल्याचे सांगितले होते. त्यानंतर काल रात्री उशिरा खुलासा करून 11 पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ले केल्याचे भारतीय हवाई दलाने स्पष्ट केले होते. मात्र आज एअर मार्शल भारती यांनी दाखविलेल्या नकाशात इस्लामाबाद, लाहोर पासून कराची पर्यंत 14 पाकिस्तानी हवाई तळांवर भारतीय हवाई दलाने हल्ले केल्याचे दिसून आले.

    Operation Sindoor: The whole world is paying attention to Prime Minister Narendra Modi’s address today!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    India Satellite : भारतात लवकरच थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट; मस्क यांची स्टारलिंक 30-31 ऑक्टोबरला मुंबईत डेमो देणार

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!