विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा यांच्या म्होरक्यांना मारण्यासाठीच पाकिस्तानात तब्बल 9 ठिकाणी मिसाईल हल्ले केले. बहावलपूर, मुरिदके, मुजफ्फरखबाद, कोटली आदी शहरांमध्ये दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. मध्यरात्री 1.30 केलेल्या या हल्ल्यांमध्ये भारतीय सैन्य दलाने लष्कर, हवाई दल आणि नौदल यांचा वापर करून दहशतवादी अड्डेच टार्गेट केले. पाकिस्तानी नागरी वस्त्या किंवा पाकिस्तानी सैन्य दलाच्या कुठल्याही ठिकाणांना टार्गेट केले नाही.
भारताने केलेल्या या हल्ल्याची माहिती भारतीय प्रतिनिधींनी अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, सौदी अरेबिया या देशांना दिली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकन संरक्षण मंत्र्यांशी चर्चा केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला अनुकूल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. पण त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सध्याचा संघर्ष लवकर संपेल, असा आशावाद व्यक्त केला.
पाकिस्तानात दहशतवादी अड्डे चालवून भारतात वेगवेगळे दहशतवादी हल्ले करणाऱ्या लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांना मारण्यासाठीच भारताने “प्रिसिजन स्ट्राईक” केले. त्यासाठी नेमकेपणाने टार्गेट निवडले आणि तिथेच मिसाईल्स डागली.
आधीच्या सर्जिकल स्ट्राईक आणि आत्ताचे प्रिसिजन स्ट्राईक यांच्यातला फरक असा की सर्जिकल स्ट्राईक झाल्याचे पाकिस्तानने मान्य केले नव्हते. त्यावेळचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सर्जिकल स्ट्राईक नाकारले होते. पण यावेळी पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी भारताने “प्रिसिजन स्ट्राईक” केल्याचे मान्य केले. भारताने केलेल्या हल्ल्याला पाकिस्तान चोख प्रत्यचत्तर देईल, असा दावा त्यांनी केला.
Operation sindoor India’s missile attacks on 9 places in Pakistan
महत्वाच्या बातम्या
- निवडणूक आयोग सुपर ॲप लाँच करणार ; जाणूनघ्या, ECINET म्हणजे काय?
- Pakistan भारतासोबतच्या तणावात पाकिस्तान पडला एकाकी, आता संयुक्त राष्ट्रांसमोर रडगाणे
- Rajnath Singh संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दि ला इशारा, म्हणाले…
- Jammu Kashmir : लष्कराचे वाहन ७०० फूट खोल दरीत कोसळले; ३ जवानांचा मृत्यू