विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताने ऑपरेशन सिंदूर मधून पाकिस्तानातल्या दहशतवादी केंद्रांवर हल्ले केल्यानंतर पाकिस्तानी सैन्य दलाने भारतामध्ये विविध ठिकाणी हल्ले केले. भारताचे नुकसान करायचा प्रयत्न केला. परंतु, भारतीय सैन्य दलाने प्रत्युत्तरादाखल दाखल केलेल्या तुफानी हल्ल्यात लाहोर मधली पाकिस्तानची हवाई संरक्षण यंत्रणा अर्थात एअर डिफेन्स सिस्टीम पूर्णपणे निकामी झाली. भारतीय संरक्षण मंत्रालयाने या बातमीची पुष्टी केली.
पाकिस्तानने काल रात्री भारतातल्या अवंतीपुरा, श्रीनगर जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर चंडीगड भटिंडा, उत्राली, नाल, फलोदी, भूज या शहरांमध्ये मिसाईल आणि ड्रोन हल्ले केले परंतु भारतीय हवाई संरक्षण यंत्रणांनी ते सगळे हल्ले फोल ठरविले. अनेक शहरांमधून ड्रोन आणि मिसाईलचा कचरा मिळाला. यातून पाकिस्तानने भारतावर हल्ला केल्याचाच पुरावा समोर आला.
भारताने आज सकाळी प्रतिहल्ला केला या प्रती हल्ल्यात लाहोर मधली पाकिस्तानची हवाई संरक्षण यंत्रणा अर्थात एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडार यंत्रणा पूर्णपणे निकामी केली. भारतीय संरक्षण मंत्रालयाने अधिकृतरित्या ही माहिती जारी केली.