वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अखेर भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जबरदस्त बदला घेतलाच. Operation sindoor ही मोहीम राबवून पाकिस्तानच्या बहावलपूर, कोटली आणि मुजफ्फराबाद मध्ये तुफानी मिसाईल हल्ला केला. मध्यरात्री 1.30 नंतर हा हल्ला केल्याचे ट्विट भारतीय सैन्य दलाने केले. ani वृत्तसंस्थेने हेच ट्विट रिपीट केले. पाकिस्तानात आणि पाकिस्तान व्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये हे हल्ले केल्याचे भारतीय संरक्षण मंत्रालयाने नमूद केले. पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला करायचे कारस्थान जिथे रचले. त्याच ठिकाणावर भारतीय सैन्य दलाने तुफानी हल्ले केले.
बहावलपूर, कोटली आणि मुजफ्फराबाद या तीन ठिकाणी भारतीय सैन्य दलाने मिसाईल हल्ला केले. पाकिस्तानी सैन्य दलाने हा हल्ला झाल्याचे मान्य केले.
त्याचवेळी पाकिस्तानी सैन्याने पूंचमध्ये भीमबेर येथे शस्त्र संधीचे उल्लंघन करून गोळीबार केला. भारतीय सैन्य दलाने या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले, असेही ट्विट भारतीय सैन्य दलाने केले.
OPERATION SINDOOR : india attack on pakistan
महत्वाच्या बातम्या
- निवडणूक आयोग सुपर ॲप लाँच करणार ; जाणून घ्या, ECINET म्हणजे काय?
- Pakistan भारतासोबतच्या तणावात पाकिस्तान पडला एकाकी, आता संयुक्त राष्ट्रांसमोर रडगाणे
- Rajnath Singh संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला इशारा, म्हणाले…
- Jammu Kashmir : लष्कराचे वाहन ७०० फूट खोल दरीत कोसळले; ३ जवानांचा मृत्यू