• Download App
    Operation sindoor भारत - पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, पण फक्त फायरिंग थांबवल्याचा भारताचा खुलासा!!

    Operation sindoor : भारत – पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, पण फक्त फायरिंग थांबवल्याचा भारताचा खुलासा!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेनंतर भारताने कुठल्याही दहशतवादाला युद्ध समजूनच ठोकायचे असा धोरणात्मक निर्णय बदलल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. त्यांनी आपल्या ट्रू सोशल मीडिया हँडलवरून भारत आणि पाकिस्तान यांनी प्रगल्भता दाखवल्याबद्दल अभिनंदन केले. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्क रुबियो आणि पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी देखील शस्त्रसंधी झाल्याच्या बातमीला दुजोरात देणारे ट्विट केले. परंतु भारताने या संदर्भात सावध आणि आक्रमक भूमिका कायम ठेवत भारत आणि पाकिस्तान यांच्या सैन्यांमध्ये फक्त फायरिंग थांबल्याचा खुलासा केला.

    “ऑपरेशन सिंदूर” सुरू असताना दुपारी 3.00 नंतर मोठ्या घडामोडी घडल्या. पाकिस्तानचे डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स यांनी भारतीय डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन यांना फोन केला. दोन्ही वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये फायरिंग थांबविण्यासंदर्भात चर्चा झाली. सायंकाळी 5.00 दोन्ही बाजूंचे फायरिंग थांबवावे, यावर एकमत झाले. त्यामुळे लष्कर हवाई दल आणि नौदल या तिन्ही दलांच्या कारवाया थांबविल्या. तशा सूचना दोन्ही बाजूंना देण्यात आल्या. यानंतर दोन्ही डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स 12 मे 2025 रोजी दुपारी 12.00 वाजता पुन्हा चर्चा करणार आहेत, अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पलीकडे विक्रम मिस्त्री यांनी काहीही सांगितले नाही.

    त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात अमेरिकेने गेले 48 तास मध्यस्थी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ तसेच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याशी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी चर्चा केली, असे अमेरिकन नेत्यांनी म्हटले असले तरी प्रत्यक्षात भारताने त्या संदर्भात कुठलाही खुलासा केलेला नाही. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्याची कुठलीही कबुली भारताने अद्याप दिलेली नाही.

    Donald Trump claims ceasefire between India and Pakistan

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mahua Moitra : बांगलादेशच्या माजी निवडणूक आयुक्तांना अटक; महुआंनी केली भारताशी तुलना, भाजपचे प्रत्युत्तर

    S Jaishankar : SCO बैठक, जयशंकर यांनी मॉस्कोमध्ये पुतीन यांची घेतली भेट, परराष्ट्र मंत्री म्हणाले- आम्ही आमच्या लोकांच्या संरक्षणासाठी प्रत्येक पाऊल उचलू

    Dr. Umar Suicide : दहशतवादी डॉ. उमर आत्मघाती बॉम्बर तयार करत होता; 11 तरुणांच्या ब्रेनवॉशसाठी 70 व्हिडिओ पाठवले