विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : “ऑपरेशन सिंदूर” प्रत्यक्ष सुरू असताना भारत आणि पाकिस्तान यांच्यात अचानक शस्त्रसंधी झाली. त्यासाठी पाकिस्तानी लष्करी नेतृत्वाने अमेरिकेकडे धाव घेतली. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीचे “क्रेडिट” घेतले. पण त्याआधी भारत पाकिस्तानात कुठपर्यंत घुसला होता आणि भारतीय हवाई दलाने कोणता पराक्रम केला होता हे मात्र भारताने अजून तरी अधिकृतरित्या सांगितले नाही, पण म्हणून भारतीय हवाई हल्ल्याचे सत्य बाहेर यायचे राहिले नाही.
भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचा अण्वस्त्र साठा असलेल्या पंजाब प्रांतातील किराणा हिल्सवर हल्ला केला होता. त्यासाठी ब्राह्मोस क्षेपणास्त्रे आणि बंकर स्फोटक बॉम्ब वापरले होते. त्यामुळे किराणा हिल्स मधल्या बंकर मध्ये ठेवलेल्या अण्वस्त्र साठ्याला धक्का लागला. अण्वस्त्र साठ्याचा स्फोट झाला नाही. कारण कुठलाही अन्य बॉम्ब अण्वस्त्रांचा स्फोट करू शकत नाही. पण ब्राह्मण क्षेपणास्त्र आणि बंकर स्फोटक बॉम्ब यामुळे अण्वस्त्र साठ्यांना धक्का लागल्यावर घातक अणू रसायनांची गळती होते. तशीच किराणा हिल्स मधल्या अण्वस्त्रांच्या साठ्यामधून गळती झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानात रेडिएशन पसरत चालले आहे. या रेडिएशनच्या वाढत्या धोक्यामुळे पाकिस्तानला किराणा हिल्स परिसरातील नागरिकांचे स्थलांतर करावे लागले आहे.
किराणा हिल्स जवळ असलेल्या मुशाब हवाई तळाचे भारतीय हल्ल्यात पूर्ण नुकसान झाले. पाकिस्तानने किराणा हिल्स वरला अण्स्त्र साठा इतरत्र हलवायचा प्रयत्न केला होता. पण भारतीय हवाई दलाने मुशाब हवाई तळाचे मोठे नुकसान केल्यानंतर प्रत्यक्षात अण्वस्त्र साठा हलविणे पाकिस्तानला शक्य झाले नाही. यातून रेडिएशनचा धोका जास्त वाढत गेला म्हणूनच पाकिस्तानला स्थानिक नागरिकांचे स्थलांतर करावे लागले.
Operation Sindoor: Brahmos and bunker buster bomb attack on Kirana Hills
महत्वाच्या बातम्या
- PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!
- Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!
- विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट
- Virat Kohli : विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट