• Download App
    Operation Sindhu पाकिस्तान विरुद्ध Operation Sindoor, इराण मधून भारतीयांच्या सुटकेसाठी Operation Sindhu सुरू!!

    पाकिस्तान विरुद्ध Operation Sindoor, इराण मधून भारतीयांच्या सुटकेसाठी Operation Sindhu सुरू!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानातल्या दहशतवादाविरुद्ध Operation Sindoor सुरू करून त्याचा पहिला टप्पा यशस्वी केला. आता इजराइल विरुद्ध इराण संघर्षात इराण मध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी भारताने Operation Sindhu सुरू केले असून त्याच्या पहिल्या टप्प्यात 110 भारतीय विद्यार्थ्यांची इराण मधून सुटका करण्यात आली असून ते लवकरच भारतात दाखल होतील. यासंदर्भातले ट्विट भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी केले. Operation Sindhu

    भारताने पाकिस्तान विरुद्धच्या सैनिकी कारवाईस ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये धर्म विचारुन 28 हिंदूंचे शिरकाण केले. त्या विरोधात ऑपरेशन सिंदूर लॉन्च करून भारताने 100 + दहशतवादी मारले पाकिस्तान मधली हवाई दलाची ठिकाणे नष्ट केली. भारताने आपल्या अटी शर्तीनुसार ऑपरेशन सिंदूरची पहिली कारवाई स्थगित केली. पण ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे थांबविले नाही.

    याच दरम्यान इस्रायल विरुद्ध इराण संघर्षात इराण मधल्या भारतीयांच्या सुरक्षेला धोका निर्माण होताच भारताने ऑपरेशन सिंधू लॉन्च केले. इराण मध्ये अडकलेल्या भारतीयांना तिथून बाहेर काढून वेगवेगळ्या मार्गांनी भारतात आणायचे हे ऑपरेशन आहे त्यातल्या पहिल्या टप्प्यात 110 विद्यार्थ्यांची सुटका केली असून ते लवकरच भारतात दाखल होतील.

    Operation Sindhu begins. India launched Operation Sindhu to evacuate Indian nationals from Iran.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही