भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे भारताला तेथील नागरिकांची चिंता आहे. इस्रायलमधून भारतीय नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी भारताने ‘ऑपरेशन अजय’ सुरू केले आहे. या निर्वासन मोहिमेअंतर्गत इस्रायलमधील भारतीयांचा दुसरा ताफा दिल्लीत सुखरूप पोहोचला आहे. २३५ भारतीय नागरिकांना घेऊन एक विशेष विमान दिल्लीला पोहोचले आहे. तर नागरिकांच्या स्वागतासाठी परराष्ट्र राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह विमानतळावर उपस्थित होते. Operation Ajay Second plane carrying Indians from Israel returns safely to Delhi 235 return home
भारतीय नागरिकांच्या दुसऱ्या तुकडीत दोन नवजात बालकांसह २३५ नागरिकांचा समावेश होता. शुक्रवारी (13 ऑक्टोबर) त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. स्थानिक वेळेनुसार रात्री 11 वाजता विमानाने इस्रायलहून उड्डाण केले. याच्या एक दिवस आधी २१२ भारतीयांना विशेष विमानातून भारतात आणण्यात आले होते.
भारताने गुरुवारी ऑपरेशन अजयची घोषणा केली. इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांचे सुरक्षित परतणे हा त्याचा उद्देश आहे. या ऑपरेशनद्वारे इस्रायलमधून तेच लोक आणले जात आहेत, जे तेथून येण्यास इच्छुक आहेत.
इस्रायलमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे की शनिवारी (१४ ऑक्टोबर) भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सांगितले की, ‘दूतावासाने आज विशेष फ्लाइटसाठी नोंदणी केलेल्या भारतीय नागरिकांच्या पुढील बॅचला ईमेल केले आहे. त्यानंतरच्या फ्लाइटसाठी इतर नोंदणीकृत लोकांना संदेश पाठवला जाईल. ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर प्रवाशांची निवड केली जात आहे. यासाठी प्रवाशांना त्यांची माहिती दूतावासाच्या डेटाबेसमध्ये भरावी लागेल.
Operation Ajay Second plane carrying Indians from Israel returns safely to Delhi 235 return home
महत्वाच्या बातम्या
- सुप्रिया सुळे यांची वैयक्तिक डायरी की महाराष्ट्राच्या आत्मपॅम्फ्लेटची तयारी??
- नितीश कुमारांना मोठा धक्का, ‘JDU’प्रदेश उपाध्यक्ष लालन पासवान यांचा राजीनामा
- हमासशी आरपारच्या मूडमध्ये अमेरिका! मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा पाठवल्यानंतर आता परराष्ट्रमंत्री इस्रायलला पोहोचले
- पेटीएम पेमेंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेने दिला दणका, 5.39 कोटींचा दंड; जाणून घ्या कारण