• Download App
    mamata Banerjee ममता बॅनर्जींच्या पराभवाचे खापर मतदारांची नावे कापण्यावर फोडायला सुरुवात; म्हणे, SIR ने केली ममतांची सत्ता बरबाद!!

    ममता बॅनर्जींच्या पराभवाचे खापर मतदारांची नावे कापण्यावर फोडायला सुरुवात; म्हणे, SIR ने केली ममतांची सत्ता बरबाद!!

    नाशिक : ममता बॅनर्जींच्या पराभवाचे खापर मतदारांची नावे कापण्यावर फोडायला सुरुवात; म्हणे, SIR ने केली ममतांची सत्ता बरबाद!!, हेच राजकीय वास्तव पश्चिम बंगाल मध्ये काल झालेल्या 152 मतदारसंघांमध्ये मतदानाच्या विक्रमी आकडेवारीनंतर समोर आले.

    पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात काल 152 मतदारसंघांमध्ये तब्बल 92.82 % मतदान झाले. निवडणूक आयोगापासून ते सर्व राजकीय पक्षांपर्यंत सगळ्यांनी मतदारांचे अभिनंदन केले. भाजप आणि तृणमूल काँग्रेस या दोन्हीही पक्षांनी आपापल्या मोठ्यातल्या मोठ्या विजयाचा दावा केला. अमित शाहांनी भाजपला पहिल्या टप्प्यात 152 पैकी 110 जागा मिळण्याचा दावा केला. पण तृणमूळ काँग्रेसच्या नेत्यांनी अमित शाह आणि भाजप यांना 2021 च्या आकडेवारीचा हवाला देऊन भाजपचा दावा खोडून काढला. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओबेरायन यांनी सोशल मीडिया पोस्ट लिहून 2021 पेक्षा मतदान घटले असल्याचा दावा केला.

    – ममतांच्या पराभवाचे खापर

    पण त्या पलीकडे जाऊन काही माध्यमांनी कालच्या विक्रमी मतदानाच्या आकडेवारीची चिकित्सा करताना ममता बॅनर्जींच्या पराभवाचे खापर प्रत्यक्ष निकाल लागण्यापूर्वीच मतदारांची नावे कापल्याच्या मुद्द्यावर काढले. निवडणूक आयोगाने मतदार यादी पुनर्नरीक्षणाची प्रक्रिया अंमलात आणल्याने तब्बल 90 लाख मतदारांची नावे यादी मधून उडवली गेली त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाला असा दावा माध्यमांनी केला.

    – मुस्लिम बहुल जिल्ह्यातील कापली १२ लाख नावे

    पण त्यापलीकडे जाऊन काही माध्यमांनी ममता बॅनर्जी यांच्या पराभवाचे खापर ५ मुस्लिम बहुल जिल्ह्यातली १२ लाख मतदारांची नावे कापण्यावर फोडले. पश्चिम बंगाल मधल्या मुर्शिदाबाद 66% मुस्लिम लोकसंख्या, मालदा 51% मुस्लिम लोकसंख्या, उत्तर आणि दक्षिण परगणा जिल्हे 26 ते 36 % मुस्लिम लोकसंख्या या चार जिल्ह्यांमध्ये १२ लाख मतदारांची नावे निवडणूक आयोगाने कापून टाकली. या चारही जिल्ह्यांमध्ये मिळून 64 पैकी 57 जागा तृणमूल काँग्रेसला मिळाल्या होत्या, अशी माहिती काही माध्यमांनी 2021 मधल्या निवडणुकीच्या हवाल्याने दिली. पण त्या चार जिल्ह्यांमधल्याच तब्बल 12 लाख मतदारांची नावे मतदार याद्यांमधून काढून टाकल्याने त्या जिल्ह्यांमध्ये मतदानावर परिणाम झाला, असा दावाही माध्यमांनी केला. या दाव्यातूनच त्यांनी ममतांच्या संभाव्य पराभवाचे खापर निवडणूक आयोगाने अंमलात आणलेल्या SIR अर्थात मतदारयाद्यांच्या पुनर्नरीक्षणावर फोडले.

    – प्रत्यक्षात SIR द्वारे मतदार याद्यांचे शुद्धीकरण

    वास्तविक SIR या प्रक्रियेद्वारे मतदार याद्यांचे शुद्धीकरण करण्यात आले. अनेक मतदारांची दुबार नावे याद्यांमधून हटविण्यात आली. बांगलादेशी घुसखोरांना मतदार यादी मध्ये स्थान उरले नाही. त्याचा परिणाम बंगाल मधल्या मतदानावर झाला. पण माध्यमांनी यातले सत्य सांगितले नाही त्याऐवजी पराभवाचे खापर SIR फोडून ते मोकळे झाले.

    Onus of mamata Banerjee’s defeat on SIR process

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Kailash Hills : दिल्लीत आयआरएस अधिकाऱ्याच्या घरी मुलीवर बलात्कार-खून; आरोपी डुप्लिकेट चावीने घरात घुसला होता

    Petrol and Diesel : पेट्रोल-डिझेल ₹28ने महागण्याच्या बातम्या खोट्या; सरकारने म्हटले- दर वाढवण्याचा प्रस्ताव नाही

    राघव चढ्ढा, हरभजन सिंग यांच्यासह ७ राज्यसभा खासदारांनी आम आदमी पार्टी फोडली; काँग्रेस आनंदी झाली!!