• Download App
    कोरोना रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्याशिवाय पर्यायच नाही : राहुल गांधी |Only way to stop Coronavirus spread now is full lockdown: Rahul Gandhi

    कोरोना रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्याशिवाय पर्यायच नाही : राहुल गांधी 

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशात कोरोनाचे संकट वाढत आहे. रुग्णसंख्या कोटीच्या घरात गेली आहे. त्यामुळे कडक लॉकडाऊन लावल्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सांगितले. याबाबत त्यांनी ट्विट करून सरकारला लॉकडाऊन लावण्याचा सल्ला दिला आहे. Only way to stop Coronavirus spread now is full lockdown: Rahul Gandhi

    कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करणं हाच एक पर्याय आहे. मात्र, लॉकडाऊन करण्यापूर्वी गरीबांना न्याय आणि संरक्षण दिलं पाहिजे. केंद्र सरकारच्या निष्क्रियतेमुळे अनेक लोकांना प्राणास मुकावे लागत आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.



    राहुल गांधी यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी देशात लॉकडाऊनला विरोध केला होता. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा गरीबांना सर्वाधिक फटका बसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

    लॉकडाऊनमुळे कोरोनाला हरवलं जाऊ शकत नाही, असं त्यांनी अनेकदा स्पष्ट केलं होतं. लसीकरण आणि कोरोना रोखण्यात येत असलेल्या अपयशावरून राहुल यांनी केंद्र सरकारवर टीका केली.धीम्यागतीने लसीकरण होत असल्याबद्दलही त्यांनी केंद्रावर टीका केली होती.

    Only way to stop Coronavirus spread now is full lockdown: Rahul Gandhi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य