• Download App
    कुंभमेळ्यात ४९ लाख नव्हे तर केवळ १५ लाख लोकांनीच लावली हजेरी, उत्तराखंड सरकारने अभ्यासानंतर केले स्पष्ट|Only 15 lakh people attended the Kumbh Mela, the Uttarakhand government clarified after a study

    कुंभमेळ्यात ४९ लाख नव्हे तर केवळ १५ लाख लोकांनीच लावली हजेरी, उत्तराखंड सरकारने अभ्यासानंतर केले स्पष्ट

    हरिद्वार येथे झालेल्या महाकुंभमेळ्यात ४९ लाख भाविकांनी हजेरी लावल्याचे म्हटले जात होते. मात्र, उत्तराखंड सरकारने केलेल्या सविस्तर अभ्यासात केवळ १५ लाख भाविकच हरिद्वार आले होते असे स्पष्ट झाले आहे. कोरोना संकटाने देशात हाहाकार उडवलेला असताना हरिद्वारमध्ये महाकुंभमेळा आयोजित करण्यात आला होता.Only 15 lakh people attended the Kumbh Mela, the Uttarakhand government clarified after a study


    विशेष प्रतिनिधी

    हरिद्वार : हरिद्वार येथे झालेल्या महाकुंभमेळ्यात ४९ लाख भाविकांनी हजेरी लावल्याचे म्हटले जात होते. मात्र, उत्तराखंड सरकारने केलेल्या सविस्तर अभ्यासात केवळ १५ लाख भाविकच हरिद्वार आले होते असे स्पष्ट झाले आहे.

    कोरोना संकटाने देशात हाहाकार उडवलेला असताना हरिद्वारमध्ये महाकुंभमेळा आयोजित करण्यात आला होता. यावरून उत्तराखंड उच्च न्यायालयाने राज्यावर ताशेरेही ओढत कुंभमेळ्याचे आयोजन ही चूक असल्याचे म्हटले होते.



    उत्तराखंड सरकारने आपल्या अधिकृत आकडेवारीनुसार १२ ते १४ एप्रिल या पवित्र दिवशी ४९ लाख भाविकांनी गंगेमध्ये स्नान केल्याचे म्हटले होते. त्यामुळे सरकारने आणि विरोधकांनीही टीका केली होती.

    परंतु, उत्तराखंड सरकारने त्यानंतर केलेल्या तपासात ४९ लाख नव्हे तर त्याच्या ७० टक्के म्हणजे १५ लाख लोकच आले होते असे म्हटले आहे.उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक संजय गुंज्याल म्हणाले, १२ एप्रिल रोजी २१ लाख भाविक गंगास्रानासाठी आले होते. १३ एप्रिल रोजी तीन लाख तर १४ एप्रिल रोजी १२ लाख भाविक आले होते.

    Only 15 lakh people attended the Kumbh Mela, the Uttarakhand government clarified after a study

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार