• Download App
    ऑनलाईन चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी महाराष्ट्रासह १४ राज्यांतील ७६ ठिकाणी छापे|Online child pornography cases, CBI raided at 76 places in 14 states including Maharashtra

    ऑनलाईन चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी महाराष्ट्रासह १४ राज्यांतील ७६ ठिकाणी छापे

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ तयार करून त्यांनी शेअर व प्रसारित केल्याप्रकरणी सीबीआयने आज देशातील 76 ठिकाणी छापेमारी करत कारवाई केली आहे. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 14 नोव्हेंबरला याप्रकरणात 23 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर 83 जणांविरूद्धात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.Online child pornography cases, CBI raided at 76 places in 14 states including Maharashtra

    ऑनलाईन चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणात सीबीआयने देशातील सुमारे 14 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या सुमारे 76 ठिकाणी छापा टाकला आहे. तपास यंत्रणेने 14 नोव्हेंबरला 83 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयनेच्या पथकाने छापा मारलेल्या राज्यात आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, ओडिसा, तामिळनाडू, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशचा सहभाग आहे.



    एनसीआरबी 2020 च्या रिपोर्टनुसार चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणात काही राज्य आघाडीवर आहे. त्यात उत्तर प्रदेशात 161, महाराष्ट्रात 123, कर्नाटकात 122 आणि केरळमध्ये 101 चाइल्ड पोर्नोग्राफी गुन्हे दाखल झाले आहे.

    यासोबतच ओडिसामध्ये 71, तामिळनाडूत 28, आसाम 21, मध्यप्रदेश 20, हिमाचल प्रदेश 17, हरियाणा 1, आंध्रप्रदेश 15, पंजाब 8 आणि राजस्थानमध्ये 6 गुन्हे दाखल आहेत. यापैकी आज केरळ व कर्नाटक वगळता बाकीच्या राज्यात सीबीआयने छापेमारी केली आहे. यासोबतच गुजरात आणि दिल्ली देखील चौकशी सुरू आहे.

    सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळपासून सीबीआयचे पथक देशातील 14 राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशातील सुमारे 76 शहरांमध्ये सर्चिंग ऑपरेशन करत आहे. दोन दिवसांपुर्वीच सीबीयाने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

    आज सकाळी आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, ओडिसा, तामिळनाडू, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या ठिकाणी छापा मारण्यात आला. देशातील सुमारे 14 राज्यांमध्ये ही कारवाई केली जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील दोन-तीन मोठ्या शहरात छापेमारी करण्यात आली आहे.

    Online child pornography cases, CBI raided at 76 places in 14 states including Maharashtra

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!