वृत्तसंस्था
गुवाहाटी : काँग्रेसचे लोकसभेतले उपनेते गौरव गोगोई आणि त्यांची ब्रिटिश पत्नी एलिझाबेथ कोलबर्न यांचे पाकिस्तान कनेक्शन किती गहिरे आणि किती घातक आहे, यासंबंधीचा अत्यंत स्फोटक रिपोर्ट आसाम सरकारच्या हाती आला असून तो लवकरच जनतेसाठी प्रकाशित करण्याची खात्री मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी आज दिली.
काँग्रेसचे लोकसभेचे उपनेते खासदार गौरव गोगोई हे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे पुत्र असून त्यांनी ब्रिटिश नागरिक एलिझाबेथ कोलबर्न हिच्याशी विवाह केला आहे. एलिझाबेथ यांचे पाकिस्तान मधल्या एका एनजीओसी संबंध असून त्यांच्यात मोठ्या आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप झाला आहे. खासदार गौरव गोगोई एलिझाबेथ यांच्याबरोबरच 13 दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यावर होते. तो दौरा संशयाच्या घेऱ्यात सापडला आहे.
या पार्श्वभूमीवर आसाम सरकारने नेमलेल्या स्पेशल इन्वेस्टीगेशन टीमने गौरव गोगोई एलिझाबेथ कोलबर्न आणि पाकिस्तानची एनजीओ यांची चौकशी आणि तपास केला त्याचा अहवाल राज्य सरकारला सोपविला. या अहवालातली 96 पाने अत्यंत स्फोटक असून त्यामध्ये पाकिस्तान कनेक्शनचे धक्कादायक निष्कर्ष आहेत अशी माहिती मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी दिली. काँग्रेसच्या खासदारांनी आणि त्यांच्या पत्नीने भारताच्या सार्वभौमतवाशी खेळ केला. त्यांनी पाकिस्तानशी व्यवहार करून भारतीय हितसंबंधांना धक्का पोहोचविला. भारताच्या संबंधाली महत्त्वाची माहिती पाकिस्तानला दिली. भारताविरुद्ध विषारी कॅम्पेन चालविले. या सगळ्याची मोडस ऑपरेंडी किती घातक आणि धक्कादायक होती, याचा सविस्तर खुलासा एसआयटीने अहवालात केला असून तो अहवाल कॅबिनेटमध्ये मंजूर झाल्यावर लगेच प्रकाशित करण्यात येईल, असे हेमंत विश्वशर्मा म्हणाले.
मात्र काँग्रेसने हेमंत विश्वशर्मा यांच्या या वक्तव्यावर आक्षेप नोंदवून गौरव गोगोई आणि एलिझाबेथ कोलबर्न यांचा बचाव केला.
On the SIT investigation report about Gaurav Gogoi’s alleged Pakistan link, CM Himanta Biswa Sarma
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींचे ‘व्होट चोरी’ कागदपत्र तर परदेशात तयार! म्यानमार कनेक्शन उघड, काँग्रेस बचावाच्या भूमिकेत
- Election Commission : निवडणूक आयोगाची राज्य अधिकाऱ्यांसोबत बैठक; मतदार पडताळणीवर चर्चा; बिहारमध्ये आधार कार्डला 12वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरण्याचे निर्देश
- Vote chori चोरीच्या आरोपांचे म्यानमार मध्ये डिजिटल धागेदोरे; राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांवर संशयाचे वारे!!
- याला म्हणतात, अमेरिकन भांडवलशाहीचा अतिउच्च बुद्धिवाद; भारतातल्या भांडवलशाही विरुद्ध fake narrative चे सोडले बाण!!