• Download App
    ममतांच्या विजयाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी आळवला राज्यांच्या स्वायत्ततेचा राग|On the occasion of Mamata's victory, Raj Thackeray lamented the anger of the states over their autonomy

    ममतांच्या विजयाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी आळवला राज्यांच्या स्वायत्ततेचा राग

    पश्चिम बंगालमधील निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी मिळविलेल्या विजयाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपला राज्यांच्या स्वायत्ततेचा राग आळवला आहे.On the occasion of Mamata’s victory, Raj Thackeray lamented the anger of the states over their autonomy


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पश्चिम बंगालमधील निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी मिळविलेल्या विजयाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपला राज्यांच्या स्वायत्ततेचा राग आळवला आहे.

    राज ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांचे ट्विरवरून अभिनंदन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या लक्षणीय यशासाठी ममता बॅनजीर्चं अत्यंत मनापासून अभिनंदन!



    संघर्ष हा तुमच्या राजकारणाचा स्थायीभाव राहिला आहे आणि या निवडणुकीत संघषाची परिसीमा गाठत तुम्ही हे नेत्रदीपक यश मिळवलंत. कलासक्त वृत्ती आणि सामाजिक सुधारणांची खूप मोठी परंपरा, ह्या बाबतीत महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल यांच्यात खूपच समानता आहे.

    त्यामुळेच राज्यांची स्वायत्ता आणि प्रांतिक अस्मिता ह्याचं महत्त्व तुम्ही नक्कीच समजू शकता. राज्यांच्या स्वायत्तेसाठीचा आग्रही आवाज तु्म्ही बनाल आणि सर्वसमावेश भूमिका घेत

    पश्चिम बंगालचा विकास साधाला अशी आशा मी व्यक्त करतो. तुम्हाला मिळालेल्या यशासाठी तुमचं आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन.राज ठाकरे यांनी यापूर्वीही ममता बॅनर्जी यांच्या राजकारणाचे कौतुक केले होते.

    त्यांनी २०१९ मध्ये ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. इव्हीएमविरोधात सुरू केलेल्या आपल्या आंदोलनात ममता बॅनर्जी यांना सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी भेट घेतली होती. त्यांना मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनाासाठी निमंत्रणही दिले होते.

    On the occasion of Mamata’s victory, Raj Thackeray lamented the anger of the states over their autonomy

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    उत्तराखंडच्या जंगलात भीषण आग; लष्कराला पाचारण, हवाई दलाच्या MI-17 हेलिकॉप्टरमधून पाण्याचा मारा

    शरद पवार यांचा इशारा, शशिकांत शिंदेंना अटक सहन होणार नाही; अवघा महाराष्ट्र पेटून उठेल

    राजकारणात मुरलेले पवार काका – पुतण्या “जे” टाळू शकले नाहीत, “ते” तरुण वरूण गांधींनी टाळून दाखविले!!