• Download App
    राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोतांच्या तोंडावर शिक्षकांनी सांगितले, होय!, बदलीसाठी पैसे द्यावे लागतात!! |On the face of Rajasthan Chief Minister Ashok Gehlot, the teachers said, yes !, you have to pay for the transfer

    राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोतांच्या तोंडावर शिक्षकांनी सांगितले, होय!, बदलीसाठी पैसे द्यावे लागतात!!

    वृत्तसंस्था

    जयपूर : आपले सरकार किती पारदर्शकपणे काम करते असे सांगणाऱ्या मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना आज शिक्षकांकडून अचानक प्रतिटोला खावा लागला.
    शिक्षकांच्या एका सत्कार समारंभात अशोक गहलोत भाषण करत असताना हा प्रकार घडला.On the face of Rajasthan Chief Minister Ashok Gehlot, the teachers said, yes !, you have to pay for the transfer

    मुख्यमंत्री अशोक गहलोत हे शिक्षकांपुढे राज्यातल्या शैक्षणिक धोरण या विषयी भाषण करत होते. यांनी भाषणात उस्फूर्तपणे शिक्षकांना विचारले, की तुम्हाला हव्या त्या ठिकाणी बदली मिळवण्यासाठी पैसे द्यावे लागतात काय…?? गेहलोतांचा हा प्रश्न संपतो न संपतो तोच सगळ्या सभागृहातल्या शिक्षकांनी एकदम हात वर करून ओरडून सांगितले, “होय आम्हाला बदली मिळवण्यासाठी पैसे द्यावे लागतात…!!”



    शिक्षकांचा हा अचानक आलेला प्रतिसाद पाहून अशोक गेहलोत चमकून गेले. व्यासपीठावरचे अन्य मान्यवर देखील गडबडले. पण एखाद्या कसलेल्या राजकारण्याप्रमाणे अशोक गेहलोत यांनी आपली बाजू सावरत, ठीक आहे. आता आपण बदल्यांची पॉलिसीच बदलून टाकू असे सांगून भाषणातून काढता पाय घेतला.

    त्याआधी शिक्षण मंत्री दोस्तारा यांनी शिक्षकांना बदल्यांसाठी पैसे द्यावे लागण्याची पॉलिसी बदलण्याची गरज व्यक्त केली होती. तोच धागा पकडून अशोक गहलोत यांनी आपले सरकार शिक्षकांसाठी पारदर्शकपणे काम करेल असे सांगितले पण नेमका त्यांनी शिक्षकांना बदली मिळवण्यासाठी पैसे द्यावे लागतात का?

    , हा प्रश्न विचारला आणि शिक्षकांनी त्या प्रश्नाला उस्फूर्तपणे जे प्रत्युत्तर दिले त्यातून तोच राजस्थानात चर्चेचा विषय बनला आहे. शिक्षकांनी मुख्यमंत्र्यांना तोंडावर कसे सणसणीत प्रत्युत्तर दिले याची चर्चा सोशल मीडिया देखील सुरू झालीआहे.

    मुख्यमंत्र्यांनी विचारलेला प्रश्न आणि शिक्षकांनी उस्फूर्तपणे दिलेले उत्तर याचे व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने त्याचा व्हिडिओ ट्विट केला आहे.

    On the face of Rajasthan Chief Minister Ashok Gehlot, the teachers said, yes !, you have to pay for the transfer

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    Nirmala Sitharaman : GST सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटी येतील; अर्थमंत्री म्हणाल्या- दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, सामान्य लोकांकडे जास्त पैसे शिल्लक राहतील

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत