• Download App
    आपल्याला पप्पू म्हणणाऱ्यांना राहुल गांधींनी करून दिली गुंगी गुडियाची आठवण! On pinching pappu Rahul Gandhi remembers his grandmother indira Gandhi, once she was called deaf doll

    आपल्याला पप्पू म्हणणाऱ्यांना राहुल गांधींनी करून दिली गुंगी गुडियाची आठवण!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पप्पू या संबोधनावर राहुल गांधींनी पुन्हा एकदा दीर्घकाळानंतरचे मौन सोडले आहे. यापूर्वी एक दोनदा त्यांनी मला पप्पू म्हणा, पण मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या!!, असे लोकसभेत म्हणून मोदी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. On pinching pappu Rahul Gandhi remembers his grandmother indira Gandhi, once she was called deaf doll

    पण आता मात्र राहुल गांधींनी पप्पू या संबोधनाला प्रत्युत्तर देताना आपल्या विरोधकांना गुंगी गुडियाची आठवण करून दिली आहे. इंदिरा गांधी 1966 मध्ये जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान बनल्या, तेव्हा समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते राम मनोहर लोहिया यांनी इंदिराजींना लोकसभेत गुंगी गुडिया असे संबोधले होते.



    त्यानंतर बरीच वर्षे विशेषतः 1971 च्या बांगलादेश युद्धापर्यंत इंदिराजींना गुंगी गुडिया हे नामाभिधान चिकटले होते. पण 1971 नंतर इंदिराजींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. बांगलादेशाची निर्मिती केली त्यानंतर त्यांच्या गुंगी गुडिया नामाभिधानात बदल होऊन त्यांना देशाची आयर्न लेडी असे संबोधले गेले. याचीच आठवण राहुल गांधींनी एका मुलाखतीत करून दिली आहे.

    विरोधक आज मला पप्पू म्हणत असतील. त्याला माझी हरकत नाही. पण हेच लोक एकेकाळी माझ्या आजीला इंदिराजींना गुंगी गुडिया म्हणून हिणवत होते. पण आज त्यांची देशात ओळख भारताची आयर्न लेडी अशी आहे. मला पप्पू म्हणणाऱ्यांच्या मनात माझ्याविषयी भीती आहे म्हणूनच ते मला हिणवत आहेत. पण मला त्यांच्या हिणवण्याविषयी किंचितही खंत वाटत नाही. कारण मी माझ्या मार्गाने पुढे चाललो आहे. मला देश जोडायचा आहे. नफरत संपवायची आहे. हिंसा संपवायची आहे, असे उद्गार राहुल गांधींनी या मुलाखतीत काढले आहेत.

    On pinching pappu Rahul Gandhi remembers his grandmother indira Gandhi, once she was called deaf doll

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट