विशेष प्रतिनिधी
मुंबई : पश्चिम बंगाल मध्ये waqf सुधारणा कायद्याच्या विरोधात कट्टरपंथी मुसलमानांनी दंगल करून तिघांची हत्या केली. प्रचंड जाळपोळ करून कोट्यावधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान केले. त्यामुळे मुर्शिदाबाद आणि जांगीपूर इथल्या हिंदूंमध्ये दहशतीचे वातावरण पसरले. हिंदूंना आपापली घरे, व्यवसाय सोडून पलायन करावे लागले. याबद्दल संपूर्ण देशात संतापाचे वातावरण असताना पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारच्या मुस्लिम मंत्र्यांनी मात्र त्यावर लिपापोती करत बंगालमध्ये शांतता असल्याचे आर. आर आबा स्टाईल समर्थन केले.
मुंबईमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. बॉम्बस्फोट केले होते, त्यावेळी महाराष्ट्राचे गृहमंत्री असलेले उपमुख्यमंत्री आर. आर. आबा पाटील यांनी ऐसी छोटी मोठी घटनाए होती रहती है!!, अशा शब्दांमध्ये मखलाशी केली होती, पण त्यांना ती भोवली आणि त्यांना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
पण पश्चिम बंगाल मध्ये waqf सुधारणा कायद्यावरून मुसलमानांनी मुर्शिदाबाद आणि जांगीपुर मध्ये दंगल करून देखील ममता सरकार जागेवरूनही हलले नाही. शेवटी कोलकाता हायकोर्टाला सरकारचे कान उपटून आता हिंसाचार ग्रस्त भागात लष्कराला पाचारण करून दंगल आटोक्यात आणा, असे सांगावे लागले.
पण पश्चिम बंगालचे ममता बॅनर्जी सरकार मधले मंत्री फरीद हकीम हे मात्र ही घटना किरकोळ असल्याचीच मखलाशी केली. मुर्शिदाबाद मधली घटना निंदनीय आहे, पण बंगाल मधले वातावरण सुरक्षित आहे. त्यामुळे तिथले हिंदू बंगाल मध्येच स्थलांतर करत आहेत. ते इतर राज्यांमध्ये जात नाहीत, अशी मुक्ताफळे फरीद हकीम यांनी उधळली. आपल्या मुक्ताफळांच्या समर्थनार्थ त्यांनी उत्तर प्रदेश आणि गुजरात मधल्या घटनांचा हवाला द्यायचा प्रयत्न केला. गुजरात आणि उत्तर प्रदेशात याच्यापेक्षा मोठ्या घटना घडल्या, त्यावेळेला दिल्लीतले लोक गप्प बसले होते, अशी आणखी मुक्ताफळे त्यांनी उधळली.+
On Murshidabad exodus, TMC leader and West Bengal Minister Firhad Hakim
महत्वाच्या बातम्या
- पवार काका – पुतणे एकत्र येण्यात गैर काय? प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्याने राजकीय चर्चा
- Ukraine : दावा- युक्रेनमधील भारतीय गोदामावर रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला; युक्रेनने म्हटले- रशियाने मुद्दाम केले
- Trump : ट्रम्प यांनी स्मार्टफोन, संगणकांना परस्पर शुल्कातून सूट दिली; लॅपटॉप, सेमीकंडक्टर, सोलर सेल्सना सूट नाही
- Sukhbir Badal : सुखबीर बादल पुन्हा अकाली दल प्रमुख बनले; 5 महिन्यांनी वापसी; तनखैया घोषित केले होते