• Download App
    सायरस पूनावाला सोडून जगातील सगळ्या धनाड्यांना ओमिक्रॉन कोरोना व्हायरस झटका, अब्जावधी रुपयांचे नुकसान|Omicron corona virus shocks billions of worldwide, except Cyrus Poonawala

    सायरस पूनावाला सोडून जगातील सगळ्या धनाड्यांना ओमिक्रॉन कोरोना व्हायरस झटका, अब्जावधी रुपयांचे नुकसान

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोनावरील लसीचे निर्माते सायरस पूनावाला वगळता जगातील सर्व अब्जाधीशांना ओमिक्रॉन कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटने झटका दिला आहे. जगातील धनाड्यांचे अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.Omicron corona virus shocks billions of worldwide, except Cyrus Poonawala

    कोरोना विषाणूचा नवा प्रकार ओमिक्रॉनच्या भीतीने जगभरात धास्तीचे वातावरण आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला आहे. भारतातील अब्जाधीशांच्या संपत्तीवरही ओमिक्रॉनचा प्रभाव दिसून आला आहे. मुकेश अंबानी यांना 3.68 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. गौतम अदानी यांना सर्वांत मोठे नुकसान सोसावे लागत आहे. अदानींना 12.4 अब्ज डॉलर्सचा झटका बसला आहे.



    ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सच्या ताज्या आकडेवारीनुसार, एलन मस्क, जेफ बेझोस, बर्नार्ड अर्नाल्ट, मार्क झुकेरबर्ग, लॅरी पेज आणि बिल गेट्स यांच्यासह सर्व धनकुबेरांची संपत्ती 38 अब्ज डॉलर्स म्हणजेच 28.5 खर्व रुपयांनी घटली आहे.

    दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनचा पहिला बाधित आढळल्यानंतर फक्त आफ्रिकाच नाही, तर संपूर्ण जग सतर्क झाले आहे. त्याचा वाईट परिणाम व्यापारी जगतावर होत आहे. गेल्या आठवड्यात एलन मस्क यांचे 8.38 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. तर जेफ बेझोस यांना 3.90 अब्ज डॉलर्स आणि बर्नार्ड अर्नाल्टला 8.26 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

    बिल गेट्स यांच्या संपत्तीत 2.68 अब्ज डॉलर्सची मोठी घट झाली आहे. लॅरी पेजची संपत्ती 3.14 अब्ज डॉलर्सने आणि युथ आयकॉन असलेल्या मार्क झुकेरबर्गची संपत्ती 2.93 अब्ज डॉलर्सने कमी झाली आहे. वॉरन बफेटसारह्यया अनेक दिग्गजांना देखील 1 ते 3 अब्ज डॉलर्सचे नुकसान सोसावे लागत आहे. जगभरातील अब्जाधीश दिवाळखोर झाले आहेत.

    Omicron corona virus shocks billions of c, except Cyrus Poonawala

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, अरविंदर सिंग लवली यांचा दिल्ली अध्यक्षपदाचा राजीनामा

    ओडिशात बीजेडीला मोठा धक्का, अनेक नेते आणि कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल!

    गुजरात किनारपट्टीवर ATS ने 14 पाकिस्तानी पकडले, 602 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त!