• Download App
    हत्येतील आरोपी ऑलिम्पियन सुशील कुमार फरार, प्रसिद्ध योगगुरूंच्या आश्रमात लपल्याचा संशय । Olympic Medalist Sushil Kumar Absconding in Murder Case, Delhi Police To Arrest Soon

    हत्येतील आरोपी ऑलिम्पियन सुशील कुमार फरार, प्रसिद्ध योगगुरूंच्या आश्रमात लपल्याचा संशय

    Olympic Medalist Sushil Kumar : पहिलवान सागर धनखड हत्याकांडातील आरोपींपैकी एक ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार हरिद्वारमध्ये दडून बसल्याचा संशय घेतला जात आहे. दै. जागरणने याबाबत दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांना माहिती मिळाली आहे की, मुख्य आरोपी ऑलिम्पियन सुशील कुमार हरिद्वार येथील देशातील प्रसिद्ध योगगुरूंच्या आश्रमात लपून बसला आहे. सुशीलच्या जवळच्या व्यक्तीनेच दिल्ली पोलिसांना ही माहिती दिली आहे. Olympic Medalist Sushil Kumar Absconding in Murder Case, Delhi Police To Arrest Soon


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पहिलवान सागर धनखड हत्याकांडातील आरोपींपैकी एक ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार हरिद्वारमध्ये दडून बसल्याचा संशय घेतला जात आहे. दै. जागरणने याबाबत दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांना माहिती मिळाली आहे की, मुख्य आरोपी ऑलिम्पियन सुशील कुमार हरिद्वार येथील देशातील प्रसिद्ध योगगुरूंच्या आश्रमात लपून बसला आहे. सुशीलच्या जवळच्या व्यक्तीनेच दिल्ली पोलिसांना ही माहिती दिली आहे.

    ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारचे नाव हत्येप्रकरणी आले आहे. यानंतर सुशील कुमार फरार झाल्यावर दिल्ली पोलिसांनी लूक आऊट नोटीसही जारी केली होती. सुशील कुमारच्या जवळचा म्हणून ओळखला जाणारा भूरा याचा जबाब पोलिसांनी अत्यंत गुप्त ठेवला आहे. त्याचा जबाब तपासात समाविष्ट होणार की नाही, हेही सांगता येत नाही. तपासाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या मते, भुरा हा सुशीलचा पूर्वी खूप जवळचा व्यक्ती होता. सुशीलची सर्व कामे तोच पाहायचा. परंतु काही वर्षांपूर्वी त्या दोघांमध्ये दुरावा आला. यानंतर सुशीलने आपल्या कामांची जबाबदारी अजय आणि भूपेंद्रला सोपवली होती.

    कसा झाला पहिलवान सागरचा मृत्यू?

    दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये 4 मे रोजी रात्री ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार पूर्ण तयारीसह पहिलवानांना घेऊन सागर धनखडची हत्या करण्यासाठी आल्याचा आरोप आहे. मालमत्तेचा वादाची यामागे पार्श्वभूमी असल्याचे सांगण्यात येत आहे. सागरच्या शरीरावर जखमा पाहून त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, सुनियोजित पद्धतीने त्याची हत्या करण्यात आली आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार सागरच्या छातील सोडून पूर्ण शरीरात लाठी आणि लोखंडी रॉडने मारल्याच्या खुणा होत्या. पायापासून ते डोक्यापर्यंत 50 हून जास्त खोल जखमा झाल्या होत्या. डोक्यावर सर्वात जास्त वार करण्यात आले होते.

    कुटुंबीयांचा आरोप- सीसीटीव्हीमध्ये मारताना दिसला सुशील

    मृत सागरच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, स्टेडियममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सुशील कुमार सागरला बेदम मारहाण करताना दिसत आहे. घटनेच्या रात्री सागरचे तीन मित्र सोनू, भगत सिंह व अमित यांनाही सुशील कुमारच्या गुंडांनी मारहाण केली होती. शनिवारी त्या सर्वांचे जबाब मॉडेल टाऊन स्टेशनमध्ये नोंदवण्यात आले होते.

    Olympic Medalist Sushil Kumar Absconding in Murder Case, Delhi Police To Arrest Soon

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य