• Download App
    ओडिशा रेल्वे अपघात की घातपात??; कसून तपासाचे आदेश, दोषींना कठोरात कठोर सजा; पंतप्रधानांचा निर्वाळा|Odisha Railway Accident or Casualty??; Orders for thorough investigation, severe punishment for the guilty; Nirwala of the Prime Minister

    ओडिशा रेल्वे अपघात की घातपात??; कसून तपासाचे आदेश, दोषींना कठोरात कठोर सजा; पंतप्रधानांचा निर्वाळा

    वृत्तसंस्था

    बालासोर : ओडिशातील बालासोर येथे आतापर्यंत झालेल्या सर्वात भीषण अपघातात 288 निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून या रेल्वे अपघाताचे सर्व बाजूंनी कसून चौकशी आणि तपासाचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांना कठोरात कठोर सजा दिली जाईल, असा स्पष्ट निर्वाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिला आहे.Odisha Railway Accident or Casualty??; Orders for thorough investigation, severe punishment for the guilty; Nirwala of the Prime Minister



    बालासोर मध्ये प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पंतप्रधान मोदींनी तिथली पाहणी करून मदत आणि बचाव कार्य लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर पंतप्रधानांनी वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये जाऊन जखमींची भेट घेऊन विचारपूस केली. त्या सर्वांना संपूर्ण बरे होईपर्यंत सरकारी मदतीचे आश्वासन दिले.

    त्यानंतर दूरदर्शनशी बोलताना पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधान मोदी म्हणाले, की बालासोर रेल्वे दुर्घटना अत्यंत गंभीर आहे. सरकारने त्याची पूर्ण दखल घेऊन भविष्यात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नेमका कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील?, याची पूर्ण चाचपणी केली आहे. या दुर्घटनेने सरकारला खूप काही शिकवले आहे. पण त्याचबरोबर या रेल्वे दुर्घटनेची सर्व बाजूंनी चौकशी आणि तपास करण्याचे आदेश दिले आहेत. यात जे कोणी दोषी आढळतील, त्यांना कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल, कोणालाही जबाबदारीतून निसटून जाता येणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली.

    Odisha Railway Accident or Casualty??; Orders for thorough investigation, severe punishment for the guilty; Nirwala of the Prime Minister

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य