वृत्तसंस्था
पाटणा : महात्मा गांधींचा जो वारसा नुकताच काँग्रेसने सोडून दिला, तो वारसा आता बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार हे पुढे चालवणार आहेत. नितीश कुमार यांनी संविधान दिनाचे औचित्य साधत बिहार मधल्या आपल्या मंत्रिमंडळाला आणि अधिकाऱ्यांना “दारू बंद”ची (दारूबंदी नव्हे) शपथ दिली.Oath of “alcohol ban” in Bihar on Constitution Day; Gandhiji’s legacy left by Congress to be run by Nitish Kumar
म्हणजे आपण दारू पिणार नाही आणि दुसऱ्याला पिऊ देणार नाही, अशी ही शपथ होती. त्याचबरोबर दारूशी संबंधित कोणत्या एक्टिविटीमध्ये भाग घेणार नाही याचाही त्यामध्ये समावेश होता. अर्थात बिहार मध्ये सरसकट दारूबंदी करण्यात आलेली नाही.
पण या शपथेचे महत्त्व असे की मध्यंतरी बिहारमध्ये बनावट दारू प्रकरणात अनेक लोकांचे बळी गेले होते. तेव्हाच सरकारने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्या गोष्टीला मर्यादा आहेत. त्यामुळे नितीश कुमार यांनी “आधी केले मग सांगितले”, या तत्वाला अनुसरून आपण स्वतः आणि आपल्या मंत्र्यांना दारू पिण्यास बंदी घातली आहे.
इतकेच नाही तर आज त्यांनी “दारू बंद”ची शपथ देखील दिली आहे. यासाठी पाटण्याच्या ज्ञानभवन मध्ये खास कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात स्वतः मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी उभे राहून सर्वांना “दारू बंद”ची म्हणजे दारू न पिण्याची शपथ दिली.
अशी शपथ मूळात महात्मा गांधी यांनी सर्व काँग्रेस जनांना दिली होती. दारू प्यायची नाही ही काँग्रेसमधल्या प्रवेशाची त्यावेळी अट होती. परंतु काही दिवसांपूर्वी ही अट शिथिल करावी, अशी मागणी काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्याकडे काही काँग्रेसजनांनी केली होती. त्यानुसार आता काँग्रेसमध्ये दारू न पिण्याची अट शिथिल करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर नितीशकुमार यांनी ज्ञानभवन मध्ये आपल्या मंत्र्यांना आणि तिथे उपस्थित असणार्या अनेकांना दारू न पिण्याची शपथ देणे याला विशेष महत्त्व आहे. एक प्रकारे काँग्रेसने बाजूला टाकलेला वारसाच नितीश कुमार हे आता सांभाळताना दिसणार आहेत.
Oath of “alcohol ban” in Bihar on Constitution Day; Gandhiji’s legacy left by Congress to be run by Nitish Kumar
महत्त्वाच्या बातम्या