• Download App
    आता या कर्मचाऱ्यांना राहणार नाही पेट्रोलची चिंता, या कंपनीने चक्क भेट म्हणून इलेक्ट्रिक स्कुटरNow these employees will no longer have to worry about petrol, electric scooters as a nice gift from this company

    आता या कर्मचाऱ्यांना राहणार नाही पेट्रोलची चिंता, या कंपनीने चक्क भेट म्हणून इलेक्ट्रिक स्कुटर

    विशेष प्रतिनिधी

    अहमदाबाद : पेट्रोलच्या वाढत्या किंमतीपासून आपल्या कर्मचाऱ्यांनादिलासा मिळावा यासाठी गुजरातमधील अलायंस कंपनीने चक्क इलेक्ट्रिक स्कुटर भेट म्हणून दिल्या आहेत.सुरत येथे असलेल्या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना हे दिवाळी गिफ्ट दिले आहे.Now these employees will no longer have to worry about petrol, electric scooters as a nice gift from this company

    पेट्रोलचे जवळपास रोज वाढणारे दर पाहता कंपनीने हा निर्णय घेतला आहे. यातून महागाईची समस्या तर सुटणारच, सोबतच पर्यावरणाला नुकसान देखील होणार नाही.अलायंस ग्रुपचे संचालक सुभाष डावर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, की पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत.



    त्यामुळे कर्मचाऱ्यांना परवडेल या विचारातून इलेक्ट्रिक स्कूटर दिवाळी गिफ्ट म्हणून देण्याचा निर्णय घेतला. या कंपनीकडून एम्ब्रॉयडरी मशीनचा व्यवसाय केला जातो. सुभाष डावर यांचा मुलगा चिरागच्या हस्ते 35 कर्मचाºयांना इलेक्ट्रिक स्कूटर देण्यात आल्या आहेत.

    कंपनीने विचारपूर्वक निर्णय घेतला की जे कर्मचारी पेट्रोल बाइक किंवा स्कूटरने येत असतात. त्यांची बचत व्हावी यासाठी या इलेक्ट्रिक स्कूटर देण्यात आल्या. कंपनीने गुरुवारीच या स्कूटर आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केल्या आहेत.

    Now these employees will no longer have to worry about petrol, electric scooters as a nice gift from this company

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    जीवघेणा वेग! अमेरिकेत भीषण रस्ते अपघातात तीन भारतीय महिलांचा मृत्यू

    मणिपूरमध्ये सीआरपीएफचे 2 जवान शहीद; कुकी अतिरेक्यांनी मैतेई गावात सेंट्रल फोर्स पोस्टवर बॉम्ब फेकले, 2 जवान जखमी

    सुप्रीम कोर्टात याचिका- NOTA ला जास्त मते पडल्यास निवडणूक रद्द करावी; निवडणूक आयोगाला नोटीस