49 जणांनी आपली पदे सोडली; भीतीचे वातावरण
विशेष प्रतिनिधी
ढाका : शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर आणि देश सोडल्यानंतर बांगलादेशात ( Bangladesh )हिंदूंसह अल्पसंख्याकांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. आता हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चन शिक्षकांना जबरदस्तीने राजीनामा देण्यास भाग पाडले जात असल्याची प्रकरणं समोर आली आहेत. वृत्तानुसार, आतापर्यंत 49 शिक्षकांकडून सक्तीचे राजीनामे घेण्यात आले आहेत.
द डेली स्टारच्या वृत्तानुसार, बांगलादेश छात्र ऐक्य परिषदेने जातिया प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत हा खुलासा केला. संघटनेचे समन्वयक साजिब सरकार म्हणाले की, हसिना यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यापासून धार्मिक आणि वांशिक अल्पसंख्याक हिंसाचाराचे बळी ठरत आहेत. बांगलादेश छात्र ऐक्य परिषद ही बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन ओक्य परिषदेची विद्यार्थी शाखा आहे.
साजिब सरकार म्हणाले की या हिंसाचारात हिंदूंवर हल्ले, लूटमार, महिलांवरील हल्ले, मंदिरांची तोडफोड, घरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांवर जाळपोळ आणि अगदी खून यांचा समावेश आहे.
देशभरातील अल्पसंख्याक शिक्षकांनाही शारीरिक छळाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे 30 ऑगस्टपर्यंत 49 शिक्षकांना राजीनामा द्यावा लागला. मात्र, १९ शिक्षकांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे.
Now resignations are being demanded from Hindu teachers in Bangladesh
महत्वाच्या बातम्या
- Tejashwi Yadav : सॅम पित्रोदा यांचा आत्मा तेजस्वी यादवमध्ये आहे का? – भाजपचा टोला!
- Haryana assembly elections : हरियाणा विधानसभा निवडणुकीची नवी तारीख जाहीर!
- Giriraj Singh attack : बेगुसराय येथे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्यावर हल्ला
- Ladki Bahin Yojna In Nagpur : नागपुरात लाडक्या बहिणींच्या कार्यक्रमात कृतज्ञता आणि उत्साहाची अपूर्व जोड!!