वृत्तसंस्था
नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) शुक्रवारी सायंकाळी नीट-यूजी २०२४ चा सुधारित निकाल जाहीर केला. पहिल्या निकालाच्या तुलनेत या वेळी कटऑफ २ अंकांनी कमी होत १६४ वरून १६२ झाला. तथापि, गेल्या वेळी पात्र ठरलेले ५७० सर्वसाधारण गटातील विद्यार्थी या वेळी यशस्वी ठरले नाहीत. वस्तुत: ४ जून रोजी ११,६५,९०४ विद्यार्थी पात्र ठरले होते, तर या वेळी ११,६५,३३४ विद्यार्थी पात्र ठरले. सर्व श्रेणींमध्ये १३,१५,८५३ विद्यार्थी यशस्वी ठरले, तर गेल्या वेळी ही संख्या १३,१६,२६८ होती.Now only 17 students got 720 marks in NEET-UG, earlier it was 67 students, revised result after Supreme Court verdict
नवीन निकालात ७२० पैकी ७२० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ६१ वरून १७ वर आली आहे. यापैकी ५ राजस्थानचे आहेत. या पाचपैकी २ सीकरचे, प्रत्येकी १ झुंझुनू, कोटा व जयपूरचा आहे. या १७ पैकी १३ मुले व ४ मुली आहेत. टॉपर्समध्ये ५ विद्यार्थी ओबीसी, २ ईडब्ल्यूएस व एक एससी प्रवर्गातील आहे. ४ जून रोजी जाहीर झालेल्या निकालात ६७ टॉपर्स होते. तर १५६३ विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षेनंतर ३० जून रोजी जाहीर झालेल्या निकालात ६१ टॉपर्स राहिले. भौतिकशास्त्राच्या एका प्रश्नाचे एकच उत्तर बरोबर म्हणून स्वीकारण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निकालात सुधारणा करण्यात आली तेव्हा केवळ १७ टॉपर्स राहिले.
महाराष्ट्र राज्य दुसऱ्या स्थानी
राज्य पात्र यशाचा दर उत्तर प्रदेश १,६५,०१५ ४९.२५ महाराष्ट्र १,४२,८२९ ५१.८५ राजस्थान १,२१,११६ ६९.२८ तामिळनाडू ८९,१९८ ५८.३२ कर्नाटक ८८,८८७ ५९.१९
Now only 17 students got 720 marks in NEET-UG, earlier it was 67 students, revised result after Supreme Court verdict
महत्वाच्या बातम्या
- WATCH : धावत्या रेल्वेला लटकून करत होता स्टंट, तरुणाने गमावला एक हात आणि एक पाय
- नवी मुंबईत 4 मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना, रहिवासी आधीच बाहेर पडल्याने टळला अनर्थ
- पॅरिस ऑलिम्पिक 2024: पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा कधी सुरू होईल अन् कुठे पाहता येणार प्रक्षेपण?
- श्याम मानव पवारांच्या वळचणीला??; गजानन महाराज, स्वामी समर्थांवर टीका करणारे “मानव” कसे??; सोशल मीडियातून टीकास्त्र