• Download App
    महाराष्ट्रात फारशा भाकऱ्या फिरवल्या नाहीत; रणजीत सिंह निंबाळकर, संजय काका पाटील, सुभाष भामरे, रक्षा खडसे यांची तिकिटे भाजपने टिकवली!!|Not many loaves were turned in Maharashtra; BJP retained the tickets of Ranjit Singh Nimbalkar, Sanjay Kaka Patil, Subhash Bhamre, Raksha Khadse!!

    महाराष्ट्रात फारशा भाकऱ्या फिरवल्या नाहीत; रणजीत सिंह निंबाळकर, संजय काका पाटील, सुभाष भामरे, रक्षा खडसे यांची तिकिटे भाजपने टिकवली!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : 2024 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जाहीर करून त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 20 उमेदवारांचा समावेश केला, त्यात प्रामुख्याने नितीन गडकरी, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार या मोठ्या नेत्यांचा समावेश असला, तरी भाजपने महाराष्ट्रात फारशा भाकऱ्या फिरवलेल्या नाहीत. उलट अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दबाव जुगारून माढा मतदारसंघातून रणजीत सिंह नाईक निंबाळकर आणि सांगलीतून संजय काका पाटील यांची तिकिटे कायम ठेवली.Not many loaves were turned in Maharashtra; BJP retained the tickets of Ranjit Singh Nimbalkar, Sanjay Kaka Patil, Subhash Bhamre, Raksha Khadse!!



    माढा मतदारसंघासाठी अजित पवार आग्रही असल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी चालविल्या होत्या. त्यासाठी अजित पवारांनी आपल्याकडचे तगडे उमेदवार म्हणून विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव पुढे केल्याचे त्या बातम्यांमध्ये म्हटले होते, पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्याशी असलेले संबंध कामाला आले. अजित पवारांचा दबाव भाजपच्या केंद्रीय नेतृत्वापुढे निष्प्रभ ठरला. माढा मतदारसंघात रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी आपले तिकीट राखले.

    त्याचबरोबर सांगलीतून संजय काका पाटील यांचे तिकीट बदलले जाईल अशा बातम्या देऊन मराठी माध्यमांनी त्यांच्या “परफॉर्मन्स” विषयी शंका उपस्थित केल्या होत्या, पण मराठी माध्यमांच्या रिपोर्ट पेक्षा भाजपने स्वतःचे अंतर्गत रिपोर्ट्स अधिक विश्वासार्ह मानले आणि संजय काका पाटील यांना सांगलीतून पुन्हा संधी दिली.

    त्याचबरोबर नगर मधून सुजय विखे पाटील, नांदेड मधून प्रताप पाटील चिखलीकर, लातूर मधून सुधाकर शृंगारे, धुळ्यातून डॉ. सुभाष भामरे अकोल्यातून अनुप धोत्रे, वर्ध्यातून रामदास तडस, भिवंडीतून कपिल पाटील, नंदुरबार मधून डॉ. हिना गावित, मुंबईतून पियुष गोयल तसेच उत्तर पूर्व मुंबईतून मिहीर कोटेचा यांना तिकिटे दिली. यापैकी फक्त उत्तर मुंबईतले गोपाळ शेट्टी यांचे तिकीट कापून तिथे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उतरवले, तर बीडमधून प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापून पंकजा मुंडे यांना उतविले आहे.

    Not many loaves were turned in Maharashtra; BJP retained the tickets of Ranjit Singh Nimbalkar, Sanjay Kaka Patil, Subhash Bhamre, Raksha Khadse!!

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Mumbai soldier : पाकविरोधात लढताना मुंबईचा जवान शहीद; मुरली नाईक यांना उरीमध्ये लढताना वीरमरण

    Neeraj Chopra : आयपीएल नंतर आता ‘ही’ क्रीडा स्पर्धा देखील भारतात झाली स्थगित

    India-Pakistan : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर