• Download App
    कोरोनामुळे झालेल्या प्रत्येक मृत्यूला वैद्यकीय निष्काळजीपणा म्हणता येणार नाही, सर्वोच्च न्यायालय; नुकसानभरपाईचाही विचार करण्यास नकार Not every death in the corona can be called medical negligence; The Supreme Court also refused to consider Indemnity

    कोरोनामुळे झालेल्या प्रत्येक मृत्यूला वैद्यकीय निष्काळजीपणा म्हणता येणार नाही, सर्वोच्च न्यायालय; नुकसानभरपाईचाही विचार करण्यास नकार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोरोनामुळे झालेल्या प्रत्येक मृत्यूला वैद्यकीय निष्काळजीपणा म्हणता येणार नाही, असे सांगत आज सर्वोच्च न्यायालयाने नुकसानभरपाईचा विचारही करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. Not every death in the corona can be called medical negligence; The Supreme Court also refused to consider Indemnity

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांचे मृत्यू झाले होते. त्यातील अनेक मृत्यू हे वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झाले, असा दावा करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. या प्रकरणी नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, कोरोना झालेल्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू हा वैद्यकीय निष्काळजीपणामुळेच झाला, असे म्हणता येणार नाही, असे सांगत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्ति डी वाई चंद्रचूड़, न्यायमूर्ति विक्रम नाथ और न्यायमूर्ति हेमा कोहली यांच्या पीठाने या संदर्भात निकाल दिला आहे. याचिकाकर्ते दीपक राज सिंह यांना त्यांच्या सूचना सक्षम अधिकाऱ्यांसमोर मांडाव्यात, असेही सांगितले आहे.

    न्यायमूर्ती यांनी सांगितले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रत्येक रुग्णाचा मृत्यू हा वैद्यकीय निष्काळजीपणामुळेच झाला, असे समजून प्रत्येकाला नुकसान भरपाई कशी काय देता येईल ?याचिकाकर्त्याच्या मुद्याशी न्यायालाय असहमत आहे.

    मानवतेच्या दृष्टीने सानुग्रह अनुदानाचा मुद्दा

    कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाना सानुग्रह अनुदान देण्याच्या दृष्टीने सहा आठवड्यात योग्य ती नियमावली तयार करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. पण हे आदेश संपूर्णतः मानवतेच्या दृष्टिकोनातून दिले आहेत. त्यामागे वैद्यकीय निष्काळजीपणाचा मुद्दा नाही आहे. सरकारने याबाबत ठोस नीती जाहीर केलेली नाही. त्यामुळे याचिकाकर्त्याने आपल्या सूचना या संबंधित सक्षम अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची गरज आहे.

    Not every death in the corona can be called medical negligence; The Supreme Court also refused to consider Indemnity

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती