विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणूक सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने विशेषतः राहुल गांधींनी उत्तर भारत आणि दक्षिण भारत याच्या भेदभाव करणारी व्यक्तव्ये केली असताना तामिळनाडूतून त्यांना पाठिंबा मिळाला. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्या पुत्राने सनातन धर्म आणि उत्तर भारतीय यांचा अपमान केला. दक्षिण भारतातल्या दुसऱ्या राज्यातल्या एका माजी मुख्यमंत्र्याचा पुत्र असाच भेदभाव करण्यासाठी समोर आला आहे.North India is a different country; Chandrasekhar Rao’s son’s separatist emancipation!!
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे पुत्र के. टी. रामाराव यांनी उत्तर भारत हा वेगळाच देश आहे. त्यामुळे त्या संदर्भातल्या प्रश्नांना मी उत्तर देऊ शकत नाही, असे सांगून राहुल गांधींच्या भेदभावी वक्तव्याच्या आगीत तेलच ओतले आहे. एएनआय वृत्तसंस्थेच्या संपादिका स्मिता प्रकाश यांना दिलेल्या मुलाखतीत रामाराव यांनी उत्तर भारत हा वेगळाच देश असल्याचे धक्कादायक फुटीरतावादी वक्तव्य केले.
देशात सर्व मोदी विरोधकांनी एकजूट केली आहे. त्या एकजुटीत तुम्ही सामील आहात का??, असा प्रश्न विचारल्यानंतर के. टी. रामाराव म्हणाले, मी उत्तर भारतीयांसंदर्भात काही सांगू शकत नाही. कारण उत्तर भारत हा वेगळाच देश आहे. दक्षिण भारतातील मोदीविरोधक मात्र एकत्र आले आहेत. त्यावर उत्तर भारत हा वेगळाच देश असल्याचे वक्तव्य तुम्ही गांभीर्याने करत आहात का??, असा प्रश्न स्मिता प्रकाश यांनी विचारल्यानंतर अगदी शब्दशः नव्हे, पण अर्थाअर्थी उत्तर भारत हा वेगळाच देश आहे, असे वक्तव्य रामाराव यांनी केले. रामराव यांच्या या वक्तव्यावरून आता राजकीय गदारोळ उठला आहे.
रेवंत रेड्डी संघाचा माणूस
तेलंगणाच्या निवडणुकीत काँग्रेसने चंद्रशेखर राव यांच्या तेलंगण राष्ट्र समितीचा दारुण पराभव केला त्यामध्ये के. टी. रामाराव यांचाही समावेश होताच. निवडणुकीनंतर काँग्रेसने जयवंत रेड्डी यांना तेलंगणाचे मुख्यमंत्री केले त्यांच्यावर के. टी. रामराव यांनी या मुलाखतीत प्रहार केले. रेवंत रेड्डी मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस आहे राहुल गांधी म्हणायचे गुजरात मॉडेल वाईट आहे. रेवंत रेड्डींनी गुजरात मॉडेलचे कौतुक केले. राहुल गांधींनी सांगितले, दिल्लीत दारू घोटाळा झाला नाही. त्यामुळे अरविंद केजरीवाल आणि के. कविता यांना तुरुंगातून सोडून दिले पाहिजे. त्याउलट रेवंत रेड्डी यांनी सांगितले की, दारू घोटाळा झाला. त्यात के. कविता दोषी असल्याने त्यांना झालेली अटक योग्यच आहे. राहुल गांधी जे बोलतात त्याच्या बरोबर विरोधात रेवंत रेड्डी बोलतात आणि वागतात.
मी पहिल्यापासूनच काँग्रेसचा विरोध करतो. कारण काँग्रेसने देशहितासाठी कुठले काम केले नाही असेच मी मानतो. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सगळ्यात मोठे कोण समर्थक असतील, तर ते राहुल गांधी आहेत. राहुल गांधींच्या प्रचारामुळे मोदींना संपूर्ण देशभरात चांगला प्रतिसाद मिळतो, असा दावा के. टी. रामाराव यांनी केला.