विशेष प्रतिनिधी
फरुर्खाबाद: कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्य पत्नीने केंद्राकडून मिळालेल्या अनुदानाचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. याबाबत न्यायालयाने खुर्शीद यांच्या पत्नी लुईस आणि संस्थेचे सचिव अख्तर फारुखी यांच्याविरुध्द अजामीनपात्र वॉरंट जाहरी केले आहे.Non-bailable warrant against Congress leader Salman Khurshid’s wife, embezzlement of Center grant
मुख्य न्याय दंडाधिकारी प्रवीण कुमार त्यागी यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ ऑगस्ट रोजी ठेवली आहे.मार्च २०१० मध्ये डॉ. झाकीर हुसेन मेमोरियल ट्रस्टला केंद्र सरकारकडून ७१ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले होते.
उत्तर प्रदेशातील १७ जिल्ह्यांतील शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या लोकांना व्हीलचेअर्स, तीनचाकी सायकली आणि श्रवण यंत्रे वाटप करण्यासाठी हे अनुदान देण्यात आले होते.
सलमान खुर्शीद हे केंद्रीय मंत्री असताना २०१२ मध्ये या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राम शंकर यादव यांनी जून २०१७ मध्ये चौकशी सुरू करून लुईस खुर्शीद आणि फारुकी यांच्याविरुद्ध कायमगंज पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता.
लुईस खुर्शीद या संस्थेच्या प्रकल्प अधिकारी होत्या. याप्रकरणी ३० डिसेंबर २०१९ रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. अपंग लोकांच्या कल्याणासाठी केंद्राकडून अनुदान मिळविण्यासाठी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या आणि शिक्क्यांचा वापर करण्यात आला होता,
असा आरोप करण्यात आला होता. हे साहित्य अपंगांना वाटप करण्यासाठी शिबिरे आयोजित करण्यात आली होती, असे ट्रस्टने म्हटले होते. चौकशीत अशी शिबिरे घेण्यात आली नसल्याचे आढळले होते.
Non-bailable warrant against Congress leader Salman Khurshid’s wife, embezzlement of Center grant
महत्त्वाच्या बातम्या
- ड्रोन उड्डाणांवर वेस्टर्न नेव्ही कमांडची कठोर भूमिका, 3 किमी रेंजमध्ये आलेले ड्रोन होणार नष्ट
- Corona Cases in india : देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, 24 तासांत 40 हजारांहून जास्त नवे रुग्ण, 4 हजार रुग्णांचा मृत्यू
- Eid-ul-Adha : राष्ट्रपती – पंतप्रधानांनी दिल्या ईद-उल-अधाच्या शुभेच्छा, सद्भाव, प्रेम आणि त्यागाची केली कामना
- pegasus Controversy : संसदेच्या बाहेरही सरकारला घेरणार काँग्रेस, वेगवेगळ्या राज्यांत घेणार पत्रकार परिषदा